Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना या तारखेपासुन 2100 मिळणार: विखे पाटलांनी सांगूनच टाकलं

0
1
Ladki Bahin Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ladki Bahin Yojana – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna E. Vikhe patil) यांनी लाडक्या बहिणी योजनेसाठी वाढीव हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. शिर्डीतील नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना विखे पाटील म्हणाले की, युती सरकार कधीही लाडक्या बहिणींना दूर करणार नाही. त्यांच्या या विधानाने लाडकी बहिण योजना आणि तिच्या वाढीव हप्त्याबाबत राज्यात सुरु असलेल्या चर्चांना वेग दिला आहे. म्हणजेच आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये बजेट झाल्यानंतर जमा होतील असे सांगण्यात आले आहे. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

मानधन 1500 रुपयांवरून 2100 रुपये –

विखे पाटील म्हणाले, “आमच्या लाडक्या बहिणी कारभारणी झाल्या आहेत. विरोधी पक्ष म्हणायचे निवडणूक संपल्यावर तुमची योजना बंद होईल, पण योजना अजूनही चालू आहे. तुम्हाला तुमच्या जानेवारी महिन्याचा हप्ता मिळेल आणि बजेटानंतर तुमचे मानधन 1500 रुपयांवरून 2100 रुपये होईल.” विखे पाटील यांनी विश्वास दिला की, लाडक्या बहिणी योजनेसाठी सरकार कधीही काहीही अडचण निर्माण होऊ देणार नाही.

महिलांचे पैसे परत घेण्याचा निर्णय (Ladki Bahin Yojana) –

दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीच्या दृष्टीने काही महिला अपात्र ठरल्याने या योजनेवर उलट सुलट चर्चा सुरु आहेत. सरकारने ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत, त्यांना योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी, सरकारने असे सांगितले होते की अपात्र महिलांच्या पैशांची वसुली केली जाणार नाही, पण आता बेकायदेशीरपणे लाभ घेतलेल्या महिलांचे पैसे परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मार्चमध्ये महिलांना 2100 रुपये मिळणार –

निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) मानधनात वाढ करून ते 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. पण, दोन महिने उलटून गेले तरी या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. यावर लाभार्थी महिलांनी सरकारकडे सवाल उपस्थित केले आहेत की, 2100 रुपये हप्ता कधी लागू होईल? पण आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपणार आहे. बजेट झाले कि मार्चमध्ये महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत.

हे पण वाचा : लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढलं!! अजितदादांनी केली मोठी घोषणा

डॉक्टर असतानाच केली UPSC ची तयारी, आता झाला IAS अधिकारी