Ladki Bahin Yojana Suspend : महायुती सरकारची अतिशय लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’. या योजनेचा लाभ तुम्ही देखील घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. महायुती सरकार कडून वारंवार विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ही योजना बंद होणार नाही असे सांगण्यात येत होते. मात्र ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे डिसेम्बर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana Suspend) खात्यात येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. चला जाणून घेऊया कारण
मिळालेल्या माहितीनुसार तात्पुरत्या स्वरुपात लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळाली आहे. तसंच, या योजनेअंतर्गत नवे अर्ज स्वीकारणंही बंद करण्यात आलं आहे. राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana Suspend) पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले होते. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
‘या’ करणामुळे योजनेमुळे स्थगिती (Ladki Bahin Yojana Suspend)
महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जात असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे विभागाकडू या योजनेची माहिती मागवण्यात आली आहे. विभागाने या योजनेसाठीचे निधी वितरण चार दिवसांपूर्वीच थांबवल्याची माहिती आयोगाला देण्यात आली आहे . परिणामी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार… (Ladki Bahin Yojana Suspend)
दरम्यान निवडणूक जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी महायुती सरकार कडून रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना बंद होणार नसल्याची ग्वाही दिली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले, विरोधक म्हणतात आम्ही सत्तेत आलो तर पोलखोल करणार,महायुतीने आणलेल्या सर्व योजना बंद करणार,अशी टीका विरोधक करतात. पण या योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही. हे खुलेआम बोलायला लागले त्यांच्यात जेलसी निर्माण झाले आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यांच्या अशा बोलण्याने लोक त्यांच्या विरोधात जातील आणि लाडकी बहीण योजनेला जर कोणी टच करायला गेलं तर त्याचा कार्यक्रम झाला समजा. त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार… (Ladki Bahin Yojana Suspend) आमच्या लाडक्या बहिणी हे ऐकून घेणार नाहीत. असा हल्लाबोल पत्रकार परिषदेच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला होता. मात्र निवडणुका झाल्यानंतर कोणेते सरकार येणार ? ही योजना चालू राहणार की नाही ? योजना चालू राहणार की नाही ? हे येणारा काळच ठरावेल. तूर्तास या योजनेला स्थगिती देण्यात आली आहे.