हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन सरकार स्थापन होण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) खूप फायदेशीर ठरली . या योजनेमुळे महिलांमध्ये सरकारबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली होती. पण आता याच योजनेवर सरकारने काटछाट करण्यास सुरुवात केली असून लाखो महिलांना अपात्र ठरवून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे धोरण अवलंबले आहे. या निर्णयाचा मोठा फटका राज्यातील 20 लाख शेतकरी महिलांवर होताना दिसणार आहे. तर चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
20 लाख शेतकरी महिलांना तोटा –
राज्यातील 20 लाख शेतकरी महिलांना या निर्णयामुळे तोटा सहन करावा लागणार आहे . सरकारने लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) निकष कठोर केल्याने अनेक महिलांना अपात्र ठरवले जात आहे. विधानसभा निवडणुकीआधी कोणतेही निकष न लावता महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर राज्यातील 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यावर थेट पाच हप्ते जमा करण्यात आले होते. पण आचारसंहितेच्या काळात हि प्रक्रिया थांबवण्यात आली होती.
थेट परिणाम नमो शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांवर –
महिला लाभार्थ्यांसाठी लागू असलेल्या पाच निकषांवर अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे. यामुळे योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना अपात्र ठरवले जात आहे. सरकारने डिसेंबर महिन्याचा हप्ता मंजूर केला असला तरी आता शेतकरी महिलांना वार्षिक 18 हजार रुपये ऐवजी 12 हजार रुपये देण्यात येणार आहेत. याचा थेट परिणाम नमो शेतकरी सहासन्मान योजनेतील (Namo Shetkari Mahasanman Yojana)लाभार्थ्यांवर होणार आहे. या योजनेंतर्गत 19 लाख महिलांना लाभ मिळत होता. पण आता लाडकी बहीण योजनेत सहा हजारांच्या लाभाला कात्री लागणार आहे.
महिलांमध्ये असंतोषाचे वातावरण (Ladki Bahin Yojana) –
विरोधकांनी आधीच या योजनेवर टीका केली होती. ही योजना फक्त निवडणुकीसाठी असून, सरकार निकषांच्या नावाखाली महिलांना फसवणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. आता सरकारच्या निर्णयामुळे महिलांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक महिला योजनेच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत.