हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lahore) एखाद्या ठिकाणी देव प्रकट झाले म्हणून त्या ठिकाणाचं नाव अमुक अमुक पडल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण एखादं शहर दैवी अंशाने स्थापित केल्याचे ऐकले आहे का? नाही? तर आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत ती ऐकून तुम्ही नक्कीचं थक्क होणार आहात. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोर शहर तुम्हाला माहित असेल. पण हे शहर प्रभू श्री रामांच्या मुलाने वसवले आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
स्वातंत्र्य चळवळींचे केंद्रस्थान ‘लाहोर’ (Lahore)
लाहोर हे शहर स्वातंत्र्यपूर्व काळात स्वतंत्रता चळवळींचे मुख्य केंद्रस्थान होते. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीवेळी १९४७ मध्ये लाहोर हे शहर पाकिस्तानच्या सीमेवर गेले. मात्र, आजही भारतीयांचा लाहोर सोबत घनिष्ट संबंध कायम आहे. तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल की या शहराची निर्मिती कुणी केली? तर मित्रांनो, पाकिस्तानमधील कराचीनंतर दुसरे भव्य मानले जाणारे ‘लाहोर’ हे शहर प्रभू श्री राम यांचे पुत्र लव यांनी स्थापित केले होते. हिंदू मान्यतेनुसार, लाहोर हे नावसुद्धा लव यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
लाहोरमध्ये वास्तव्यास होते श्री राम पुत्र लव
काही मान्यत्यांनुसार असे सांगण्यात आले आहे की, जेव्हा प्रभू श्री रामाने वानप्रस्थ जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा भरतने नकार देऊनही त्यांनी आपले राज्य आपल्या पुत्रांना दिले. श्री राम यांना लव आणि कुश असे दोन पुत्र होते. त्यामुळे श्री रामांनी दक्षिण कोसला, कुशस्थली (कुशावती) आणि अयोध्याचे राज्य पुत्र कुशच्या स्वाधीन केले. कुशावती हे आज पंजाबमधील कसूर जिल्हा म्हणून ओळखले जाते.
(Lahore) तर श्री रामांनी पंजाबचे राज्य पुत्र लवला सुपूर्त केले. ज्यामुळे लव यांनी लवपुरीला आपली राजधानी बनवले आणि तिथेच वास्तव्यास सुरुवात केली. लव यांच्या नावावरून त्याकाळी लवपुरी म्हणून हे शहर प्रसिद्ध होते. जे आज लाहोर म्हणून ओळखले जाते. मात्र, वाल्मिकी रामायणात याबाबत उल्लेख केलेला नाही. त्यामुळे लवपुरीबाबत रामायणात माहिती सापडणार नाही.
लाहोर किल्ल्यात आहे लव मंदिर
लाहोर किल्ल्याचा अस्सल उल्लेख ११८० मध्ये मुहम्मद सोनच्या लाहोरवरील स्वारीच्या संदर्भात आढळतो. १२६७ मध्ये सम्राट बल्बनने त्याची पुनर्बांधणी केली होती असे यात म्हटले आहे. मात्र सध्या तो ज्या आकारात दिसतो तो अकबर तिसऱ्या मुघल सम्राटाने १५६६ साली बांधलेला होता. (Lahore) या लाहोर किल्ल्यात आजही लवच्या सन्मानार्थ समर्पित मंदिर आहे. जे लाहोर किल्ल्याच्या आत बांधलेले आहे.
पूर्वी पंजाबमध्ये शिख राज्य असताना या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. मात्र, आज हे मंदिर ओसाड पडले आहे. आता या मंदिराची देखभाल आणि पूजा करण्यासाठी कुणीही नसल्यामुळे हे प्राचीन मंदिर मोकळे पडले आहे. त्याचप्रमाणे, उत्तर लाहोरमधून वाहणाऱ्या रावी नदीला हिंदू देवी दुर्गा यांच्या सन्मानार्थ नाव देण्यात आले होते.
४००० वर्षांचा जुना इतिहास
एका अहवालानुसार, पाकिस्तानातील पंजाब प्रांतांमधील लाहोर हे शहर सुमारे ४ हजार वर्ष जुने आहे. काही तज्ञांनी तसा दावा केला आहे. तर ग्रीक भूगोलशास्त्रज्ञ टॉलेमीच्या मते, लाहोर या शहराची स्थापना पहिल्या शतकाच्या शेवटी कुठेतरी झाली होती. तर उद- ए- आलमहोर या पुस्तकानुसार ८८२ मध्ये एक शहर प्रकट झाले. ज्याला लाहोर असे नाव मिळाले. (Lahore)
तसेच अरब आक्रमणापूर्वी अनेक महान हिंदू आणि बौद्ध राज्यकर्ते लाहोरमध्ये आले होते. लाहोरचा गजबजलेला परिसर टिब्बी बाजार या ठिकाणी मध्यभागी एक शिवमंदिर देखील आहे. या प्राचीन शिव मंदिराला ‘टिब्बी वाला शिवालय’ असे म्हणतात.