‘ऑपरेशन सिंदूर’नंतर लाहोरमध्ये सलग 3 भीषण स्फोट! पाकिस्तान हादरला, मिसाइल हल्ल्याचा संशय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lahore Explosions in Pakistan: भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाक आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक मिसाइल हल्ला केल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर अवघ्या काही तासांत लाहोर शहरात सलग तीन भीषण स्फोट झाले असून, त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा हादरला (Lahore Explosions in Pakistan) आहे. या स्फोटांमुळे लाहोरमध्ये सायरन वाजू लागले, विमानतळ बंद करण्यात आले आणि सोशल मीडियावर मिसाइल हल्ल्याचे दावे होऊ लागले आहेत.

पाकिस्तानच्या लाहोर शहरात गुरुवारी सकाळी सलग तीन जोरदार स्फोट झाले असून, संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या स्फोटांनंतर लाहोरमध्ये सायरनचा आवाज घुमू लागला असून, शहरातील वाल्टन विमानतळ तत्काळ बंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर मिसाइल हल्ल्याचा दावा करण्यात येत असून, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

लाहोर हादरलं (Lahore Explosions in Pakistan)

केवळ काही तासांपूर्वी भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर प्रिसिजन मिसाइल हल्ला करून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केलं होतं. ही कारवाई 2022 च्या पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच लाहोरमध्ये सलग तीन स्फोट झाल्याने, या दोन घटनांमध्ये संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

वाल्टन विमानतळाजवळ धुराचे लोट

लाहोरच्या गोपाल नगर आणि नसीराबाद भागातील वाल्टन रोडवर या स्फोटांचे आवाज पहाटेच्या सुमारास ऐकू आले. स्थानिकांनी सांगितले की, स्फोटांनंतर आकाशात काळा धुराचा मोठा लोट दिसला आणि लोक घाबरून घराबाहेर (Lahore Explosions in Pakistan) आले. काही प्रत्यक्षदर्शींनी स्फोटांनंतर ड्रोन उडताना पाहिल्याचंही सांगितलं आहे.

असकरी ५ परिसर आणि नौसेना कॉलेजजवळ दोन मोठे स्फोट झाल्याचेही रिपोर्ट्स आहेत. या परिसरात आगीचे लोळ आणि धुराचे ढग दिसल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या संपूर्ण परिसरात पोलिस आणि बचाव पथकांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर; भारतातही हाय अलर्ट

या स्फोटांनंतर पाकिस्तानमध्ये एकंदरच सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, भारतातही संरक्षण यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. भारत सरकारने काही उड्डाणे रद्द केल्या असून, संवेदनशील भागांतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे. बँकिंग व इन्फ्रास्ट्रक्चर यंत्रणाही अलर्ट मोडवर आहेत.

अधिकृत माहितीची प्रतीक्षा (Lahore Explosions in Pakistan)

सध्या या स्फोटांमागचं कारण आणि सूत्र स्पष्ट झालेलं नसून, पाकिस्तान सरकार किंवा लष्कराकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मिसाइल हल्ल्याचे दावे सुरू असून, लवकरच याबाबत स्पष्टीकरण मिळण्याची शक्यता आहे.