तब्बल 700 किलोमीटर खोलीवर आढळला महासागर ; आता महासागराची संख्या 6 होईल ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या आत एक नव्या महासागराचा शोध लावला आहे, जो इतर सर्व महासागरांपेक्षा तीन पट मोठा आहे. हा महासागर पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली तब्बल 700 किलोमीटर खोलीवर आढळला आहे. उत्तर पश्चिम विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या मेंटलमध्ये या महासागराचा शोध घेतला आहे. पृथ्वीवर सध्या पाच महासागरांचा समावेश आहे. या नवीन शोधामुळे महासागराची संख्या सहा होईल का हा महत्वाचा प्रश्न उपलब्ध झाला आहे. हा शोध वैज्ञानिक दृष्टीने महत्त्वाचा मानला गेला आहे.

कसा शोधला हा महासागर

वैज्ञानिकांनी सीस्मोग्राफचा वापर करून हा महासागर शोधला. अमेरिकेच्या विविध भागांमध्ये सीस्मोग्राफचे जाळे पसरवण्यात आले होते. सीस्मोग्राफच्या मदतीने पृथ्वीच्या आतल्या ढाच्याबद्दल माहिती मिळते. 500 पेक्षा जास्त भूकंपांच्या झटक्यांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी हे लक्षात आले की एका विशिष्ट ठिकाणी मेंटलमधून जाणाऱ्या लहरींची गती कमी होत आहे . यामुळे त्यांना समजले की त्या ठिकाणी खडकांच्या आत पाणी अडकलेले आहे.

महासागर म्हटले जाणार का ?

पृथ्वीवर प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंद महासागर, आर्कटिक महासागर, अंटार्कटिक महासागर (दक्षिणी महासागर) असे पाच महासागर आहेत. या शोधामुळे यांची संख्या सहा होणार का त्यावर वैज्ञानिक म्हणतात कि , या ठिकाणाला महासागर म्हटले जाणार नाही , कारण हे पाणी क्रिस्टलच्या आत अडकलेले आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हे पाणी पृथ्वीवरील महासागरांच्या स्थिरतेसाठी महत्त्वाचे आहे. जर हे पाणी पृष्ठभागावर आले असते, तर पृथ्वीवर केवळ उंच पर्वत दिसले असते आणि समुद्र कमी प्रमाणात अस्तित्वात असते.

पृथ्वीवरील तीन स्तर

पृथ्वीवर तीन स्तर आढळतात, त्याला परत किंवा थर असेही म्हटले जाते . पहिला थर क्रस्ट असून, हा सर्वात वरचा पातळ परत आहे . ज्यावर आपण चालतो. या थरात माती, पाणी, पर्वत, नद्या, महासागर, आणि जीवसृष्टी असते. पृथ्वीच्या क्रस्टमध्ये खूपच कमी जाडी असते, पण याच्यावर आपलं संपूर्ण जीवन आहे. क्रस्टखाली मॅन्टल आहे, जी खनिज पदार्थांनी बनलेली असते. या थरात तांबड्या रंगाचं गरम लाव्हारस असतो, जो हलत असतो. मॅन्टल पृथ्वीच्या आतल्या कोअरपर्यंत पसरलेली आहे. सर्वात खालचा थर , जो दोन भागांमध्ये विभागलेली आहे. बाहेरील कोअर आणि आतील कोअर. बाहेरील कोअर द्रव पदार्थांपासून बनलेली असते आणि खूपच गरम असते. यामध्ये इतकी उष्णता असते की कोणताही पदार्थ घन रूपात राहू शकत नाही. आतील कोअरमध्ये उष्णता अधिक आहे. त्यामुळे गाभ्यात कोणतेही ठोस पदार्थ अस्तित्वात राहू शकत नाहीत.