Lemonade Premix : उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळा आला म्हंटल की सरबतं, थंड पेय यांचे सेवन सर्रास केले जाते. लिंबू सरबत त्यापैकीच एक असलेला प्रकार. लिंबू सरबत प्रत्येक घरात आवर्जून बनवले जाते. शिवाय उन्हाळयात जर पाहुणे घरात आले तर चहा ऐवजी साधा सोपा प्रकार म्हणजे लिंबू सरबत बनवून दिले जाते. मात्र उन्हाळयात लिंबू महाग होतात. आणि आयत्यावेळी सरबत (Lemonade Premix) करायचे म्हटले की त्यासाठी वेळही जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिंबू सरबत परिमिक्स कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
उन्हाळा आल्यावर इतर कोल्ड ड्रिंक घेण्यापेक्षा घरगुती बनवलेले लिंबू सरबत केव्हाही चांगले. लिंबूच्या रसात व्हिटॅमिन सी असते. जे तुम्हाला ताजे तवाने ठेवते. लिंबू सरबत थकवा दूर करते. शरीराला हाड्रेटेड ठेवण्यास देखील लिंबू सरबत मदत करते. शिवाय लिंबू सरबत पिल्याने ऊर्जा मिळते. चला तर मग जाणून घेऊया लिंबू सरबतचे प्रिमिक्स (Lemonade Premix) कसे बनवायचे ? जेणेकरून तुम्ही ऐनवेळी याचा वापर करून काही सेकंदामध्ये लिंबू सरबत बनवू शकाल.
साहित्य (Lemonade Premix)
लिंबू, साखर, मीठ
कृती
- एका ताटात एक कप लिंबाचा रस घ्या
- त्यामध्ये तीन कप साखर घालून मिक्स करून घ्या
- हे ताट फॅनखाली ठेऊन हे मिश्रण (Lemonade Premix) सावलीत वाळू द्या
- ७-८ तासानंतर हे मिश्रण मोकळे करा
- जोपर्यंत हे मिश्रण पावडर स्वरूपात होत नाही तोपर्यंत ते वाळवून घ्या यासाठी साधारण ३-४ दिवस लागतील.
- हे मिश्रण कोरडे झाल्यानंतर त्यामध्ये हवे तेवढे चवीनुसार मीठ घाला
- हे मिश्रण मिक्सरच्या भांडयात फिरवून घ्या
- तयार पावडर हवाबंद डब्यात साठवा
- एक ग्लास पाण्यात एक चमचा प्रिमिक्स (Lemonade Premix) टाका झटपट लिंबू सरबत होईल तयार.