जंगली प्राणी आणि मानव यांच्यातला संघर्ष काही नवा नाही. केवळ ग्रामीण भागच नाही तर जंगली प्राण्यांनी आता शहराकडे सुद्धा वळवल्याचे आपल्याला अनेक घटनांमधून पाहायला मिळते. त्यातच बिबट्या म्हणजे अतिशय हिंस्त्र प्राणी. झाडीतून लपत छपत अचानक हल्ला करून जीव घेणे ही त्याची खासियत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला करून त्याच्या खांद्याचा तोडला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सुद्धा भीती वाटल्याशिवाय राहणार नाही.
काय आहे व्हिडीओ ?
या व्हिडिओमध्ये एक बिबट्या चुकून मानवी वस्तीत आल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो लोकांवर हल्ले करू लागतो. या व्हिडिओमध्ये बिबट्या एका वस्तीत शिरताना दिसतो. यादरम्यान तो एका व्यक्तीवर हल्ला करतो बिबट्या अचानक त्या व्यक्तीवर हल्ला करतो त्यामुळे सुरुवातीला त्याला सावरण्याची संधी मिळत नाही. त्याचवेळी बिबट्या त्या व्यक्तीच्या खांद्याचा लचका तोडतो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला सुद्धा काही क्षण भीती वाटल्याशिवाय राहणार नाही.
बिबट्याच्या समोर नको ते धाडस दाखवण्याचीची कृती या माणसाच्या अंगलट आलेली या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. यापूर्वी बऱ्याचदा तुम्ही बिबट्या घराजवळ असलेला कुत्र्यांना किंवा पाळीव प्राण्यांना, जनावरांना शिकार करत असल्याचे दिसून येते. मात्र आता बिबट्या सारखे प्राणी थेट माणसांवर हल्ला करायला डगमगत नाहीत हेच या व्हिडिओ मधून स्पष्ट होत आहे.