Less Sleep : काय?? 5 तासांपेक्षा कमी झोपता? सावधान!! होऊ शकतात गंभीर आजार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Less Sleep) निरोगी आरोग्य हवे असेल तर केवळ चांगला आहार आणि नियमित व्यायाम पुरेसा नाही. यासोबत महत्वाची असते ती पूर्ण झोप. अनेक लोकांचा कामाचा व्याप ऐहिक असतो. यामुळे त्यांना आवश्यक तितकी झोप घेता येत नाही. नक्कीच यात तुमची चूक नाही. पण वेळेचे आणि कामाचे नियोजन करून कमीत कमी आठ तास झोप घ्यायला हवी. आरोग्य तज्ञ सांगतात की, चांगल्या आरोग्यासाठी माणसाने किमान ८ तास झोप घ्यायलाच हवी. पण अनेक लोकांना दैनंदिन जीवनशैलीत ५ तास झोप घेणे देखील अवघड जाते. जर तुम्हीच ५ तासापेक्षा कमी झोपत असाल तर तुमच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

एकीकडे घड्याळ्याच्या काट्यावर चालणारं आयुष्य आणि दैनंदिन कामकाज, दुसरीकडे आरोग्याची मात्र हेळसांड होत असते. अपूर्ण झोप आपल्या आरोग्यावर कशी आणि काय परिणाम करते याची आपल्याला कल्पना देखील नसते. पण कमी झोप म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण. (Less Sleep) त्यामुळे झोपेचे नियोजन हे व्हायलाच हवे. आज आपण कमी झोपेमुळे शरीरावर कोणती विपरीत परिणाम होतात याविषयी जाणून घेऊ. म्हणजे तुम्हीही कमी झोप घेत असाल तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आरोग्यावर याचा किती वाईट परिणाम होतोय.

रोग प्रतिकार शक्ती कमी होते (Less Sleep)

आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती कोणत्याही संसर्गजन्य आजारांपासून आणि विषाणूंपासून आपले रक्षण करत असते. त्यामुळे इम्युनिटी मजबूत असणे ही आरोग्याची गरज आहे. अशात जर आपण ५ तासांपेक्षा कमी झोप घेत असू तर याचा परिणाम साहजिकच रोग प्रतिकार शक्तीवर होतो. परिणामी संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो.

मूड स्विंग्स

जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर तुमचा दुसरा दिवस अत्यंत चिडचिडा, तणावपूर्वक आणि चिंतेने ग्रासलेला असू शकतो. (Less Sleep) कमी झोपेमुळे मेंदू थकलेला असतो आणि त्याला पूर्ण आराम न मिळाल्यामुळे याचा परिणाम आपल्या मूडवर होतो. अशावेळी मूड स्विंग्सची समस्या जाणवते. आपला स्वभाव मुळात चिडचिडा नसला तरीही आपण चिडचिड करू लागतो.

मधुमेहाचा धोका

अपुरी वा कमी झोप मधुमेहाचा धोका वाढवते. जगभरात मधुमेहींची संख्या फार जास्त आहे. यातील अनेक लोकांच्या जीवनशैलीत कमी झोप हे महत्वाचा कारण दिसून आले आहे. (Less Sleep) अनेकांचा असा समज आहे की केवळ गोड पदार्थांचे सेवन केल्याने आणि अनियमीत खाण्याच्या सवयीने मधुमेहाचा धोका वाढतो. मात्र मधुमेह होण्यामागे अपुरी झोप देखील कारणीभूत असते हे तज्ञांनी सिद्ध केले आहे.

स्मृती भ्रंश होण्याची शक्यता

जर तुम्ही ५ तासांपेक्षा कमी वेळ झोपत असाल तर याचा परिणाम तुमच्या मेंदूवर आणि मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांवर होऊ शकतो. परिणामी मेंदूचा थकवा वाढत गेल्यास कालांतराने स्मृती भ्रंशसारखा आजार होण्याची शक्यता असते. (Less Sleep)