LIC Claim Process : LIC क्लेम कसा दाखल कराल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Claim Process) गुंतवणूक क्षेत्रात गुंतवणूकदार सगळ्यात आधी विमा क्षेत्राला प्राधान्य देतात. यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC वर ग्राहकांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळे एलआयसीच्या माध्यमातून अनेक लोक विविध योजनांद्वारे गुंतवणूक करताना दिसतात. शिवाय एलआयसी देखील आपल्या ग्राहकांसाठी कायम आकर्षक पॉलिसी ऑफर करताना दिसते. या पॉलिसी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आर्थिक पूल म्हणून काम करतात.

अनेक लोक एलआयसीच्या माध्यमातून सादर केल्या जाणाऱ्या काही पॉलिसी विकत घेतात. जेणेकरून भविष्यात मदत होईल. मात्र पॉलिसी विकत घेतल्यानंतर दुर्दैवाने जर एखादी आपत्ती आपल्यावर कोसळली तर अशावेळी एलआयसी क्लेम (LIC Claim Process) अर्थात एलआयसीवर दावा कसा दाखल करायचा? याविषयी आपल्याला माहिती नसते. त्यामुळे खूप गडबडायला होत. असं तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून आज आपण एलआयसी क्लेम कसा करावा? याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर अगदी सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ.

LIC क्लेम करण्याची प्रक्रिया (LIC Claim Process)

1. एलआयसीच्या होम ब्रांचला भेट द्या – जर दुर्दैवाने तुमच्या कुटुंबातील पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूचा दावा दाखल करण्यासाठी ही प्रक्रिया करावी लागते. याची पूर्ण प्रोसेस पॉलिसीच्या नॉमिनीला करावी एलआयसीच्या होम ब्रांचमध्ये पूर्ण करावी लागते. अर्थात ज्या ठिकाणाहून पॉलिसी जारी करण्यात आली आहे त्या ठिकाणी भेट द्यावी.

2. निधी ट्रान्सफर फॉर्म घ्या – (LIC Claim Process) यानंतर पॉलिसी धारकाच्या मृत्यूची त्यांना माहिती द्यावी आणि नॉमिनेटेड म्हणजेच नामनिर्देशित व्यक्तीच्या बँक खात्यात संबंधित निधी ट्रान्सफरसाठी शाखा अधिकाऱ्याकडून फॉर्म 3783, फॉर्म 3801 आणि NEFT फॉर्म घ्यावा.

3. आवश्यक कागदपत्रे – यानंतर मृत व्यक्तीचे मूळ मृत्यू प्रमाणपत्र, मूळ पॉलिसी बॉण्ड, नॉमिनीचे पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्टची प्रत आणि मृत झालेल्या पॉलिसीधारकाचा कोणताही ओळखीचा पुरावा (उदा. आधार कार्ड) इत्यादी कागदपत्रे जमा करावी. ही कागदपत्रे पॉलिसीच्या नॉमिनीला स्व- साक्षांकित करावी लागतील.

4. घोषणापत्र – हा फॉर्म भरल्यानंतर त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडताना नॉमिनीला एक घोषणा पत्र सादर करावे लागेल. यात नॉमिनीला संबंधित मृत पॉलिसी धारकाच्या मृत्यूची तारीख, मृत्यूचे ठिकाण आणि मृत्यूचे कारण नमूद करावे लागेल. (LIC Claim Process) तसेच NEFT फॉर्मसह कॅन्सल चेक आणि बँक पासबुकची प्रत सादर करावी. यात बँकेच्या खातेदाराचे नाव, खाते क्रमांक आणि बँकेचा आयएफएससी कोड असायला हवा. बँकेच्या पासबुकची छाया प्रत इतर कागदपत्रांसह नसेल तर तुमची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.

5. मूळ कागदपत्रे जवळ ठेवा – आतापर्यंत सांगितलेली सर्व कागदपत्रे सादर करत्यावेळी नॉमिनेटेड व्यक्तीने मूळ कागदपत्रे अर्थात ज्या कागदपत्रांच्या प्रती तो सादर करणार आहे त्यांच्या मूळ प्रति जवळ ठेवाव्या. पडताळणीसाठी त्याचे पॅन कार्ड, मृत व्यक्तीचे ओळखपत्र आणि मूळ पासबुकही जवळ ठेवावे. (LIC Claim Process) कारण मृत्यूच्या दाव्यावर प्रक्रिया करण्याकरिता कागदपत्रे मंजूर व्हावी लागतात. ज्यासाठी एलआयसी अधिकारी मूळ पासबुकच्या प्रतिवरून पडताळणी करतात. लक्षात घ्या, LIC अंतिम रक्कम नॉमिनेटेड व्यक्तीच्या खात्यात जमा होण्याआधी या कागदपत्रांशिवाय काही जास्तीचे कागदपत्रदेखील मागू शकते.

6. क्लेम सबमिशननंतर पावती घ्या – वर सांगितलेली सर्व कागदपत्रे LIC शाखेत जमा केल्यानंतर त्यांच्याकडून पोहचपाती घ्यायला विसरू नका. ही पावती तुमच्याकडे सुरक्षित ठेवा. जर LIC ने अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली नाही तर नॉमिनेटेड व्यक्तीच्या बँक खात्यात वा त्या व्यक्तीला एका महिन्यात सेटलमेंट रक्कम दिली जाते. मात्र एका महिन्यात तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली नाही तर तुम्ही ती पावती LIC शाखेत घेऊन जा आणि क्लेम स्टेटसची विचारणा करा. (LIC Claim Process)