LIC संदर्भात सगळ्यात मोठी बातमी; कंपनीला घ्यावा लागला ‘हा’ महत्वाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात LIC ही देशभरातील फार जुनी विमा कंपनी आहे. गेली अनेक वर्ष आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक जबरदस्त योजना आणि फायदे प्रदान करणारी एलआयसी सर्वात मोठी विमा कंपनी आहे. आज LIC च्या ग्राहकांची संख्या प्रचंड मोठी आहे. अनेक गुंतवणूकदार मोठ्या विश्वासाने एलआयसीच्या योजनांमध्ये डोळे झाकून गुंतवणूक करतात. त्यामुळे देशभरात एलआयसीचे कोट्यवधी पॉलिसीधारक आहेत. त्याच पॉलिसी धारकांसाठी आज अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. तुम्हीही एलआयसी पॉलिसी धारक असाल तर ही बातमी चुकूनही स्किप करू नका.

LIC चा मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसीने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा परिणाम साहजिकच पॉलिसी धारकांवर होणार आहे. त्यानुसार, एलआयसी आता देशातील मेट्रो शहरांमधल्या रिअल इस्टेट मालमत्ता विकणार आहे, असे समजत आहे. यातून एलआयसी एकूण ६- ७ बिलियन डॉलर इतकी रक्कम उभी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी एलआयसी आपल्या प्लॉट आणि कमर्शियल इमारतींचीसुद्धा विक्री करणार असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तानुसार, एलआयसीने आपल्या मालमत्तेच्या विक्रीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत इंटर्नल टीमला सूचनादेखील दिल्या आहे. ज्याची सुरुवात मुंबईतील मालमत्ता विकून केली जाईल, असेही समोर आले आहे.

LIC ची मालमत्ता विकली जाणार

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असून स्टॉक मार्केटमधील सर्वाधिक गुंतवणूक करणारी नामांकित कंपनी आहे. तिच्या मालमत्तेत, दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील जीवन भारती बिल्डिंग तसेच कोलकातामधील चित्तरंजन अव्हेन्यू स्थित एलआयसी बिल्डिंग आणि मुंबईतील एशियाटिक सोसायटी, अकबर रॅलीतील एका हाउसिंग प्रॉपर्टीचा समावेश आहे. वृत्तानुसार, या मालमत्तेची अंतिम व्हॅल्युएशन लक्षात घेता याची एकूण किंमत ५० ते ६० हजार कोटी रुपयेच्या आसपास आहे.

LIC च्या संपत्तीचे मूल्यांकन होणार

वृत्तानुसार, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीकडे एकूण ५१ ट्रिलियन रुपयांची मालमत्ता आहे. जिच्या विक्री प्रक्रियेपूर्वी ही कंपनी आपल्या मालमत्तेचे एकूण मूल्यांकन करेल, असे सांगितले जात आहे. अद्याप एलआयसीच्या बऱ्याच संपत्तीचे मूल्यांकन केलेले नाही. ते आता केले जाईल. शक्यता आहे की, उर्वरित संपत्तीचे मूल्यांकन हे वास्तविक किमतीपेक्षा पाचपट जास्त असू शकते. अर्थात हा आकडा सुमारे ३ ट्रिलियन रुपयांच्या आसपास वाढू शकतो.