LIC Kanyadan Policy : मुलींच्या लग्नासाठी LIC देते लाखो रुपये; ‘या’ योजनेत जमा करा फक्त 151 रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Kanyadan Policy) ज्या घरात मुलगी असते त्या कुटुंबाला तिच्या लग्नाची मोठी काळजी असते. लेकीचं लग्न करायचं म्हणजे कोणतीही कमी पडणार नाही यासाठी तिचे आई वडील प्रचंड कष्ट घेत असतात. तुमच्याही घरात जर मुलगी असेल तर आता तिच्या लग्नाची काळजी करण्याची गरज नाही. कारण, LIC च्या कन्यादान योजनेत दररोज केवळ १५१ रुपये जमा केल्यास तुम्हाला एकाच वेळी ३१ लाख रुपये मिळू शकतात. तुम्हाला या योजनेबद्दल माहित नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे असे समजा. चला तर LIC कन्यादान पॉलिसीबद्दल जाणून घेऊया.

LIC कन्यादान योजना (LIC Kanyadan Policy)

एलआयसीने मुलींच्या भविष्यासाठी एक अत्यंत उत्तम योजना आणली आहे. या योजनेचे नाव ‘LIC कन्यादान योजना’ असे आहे. या योजनेत दररोज १५१ रुपये जमा केल्यास भविष्यात तुम्हाला एलआयसीकडून लाखो रुपये दिले जातात. ही पॉलिसी तुम्ही तुमच्या मुलीसाठी किंवा बहिणीसाठी सुरु करू शकता. या योजनेची कालमर्यादा १३ वर्षे ते २५ वर्षे इतकी आहे.

किती वर्षे प्रीमियम भरायचे?

या योजनेमध्ये किती वर्षे प्रीमियम भरायचे? हे तुम्ही ठरवू शकता. (LIC Kanyadan Policy) ही पॉलिसी घेण्यासाठी तुमचे वय किमान ३० वर्षे आणि तुमच्या लेकीचे वय किमान १ वर्ष असायला हवे. ही एलआयसी कन्यादान योजना २५ वर्षांसाठीच्या कालावधीसह घेता येते. यात तुम्हाला प्रीमियम म्हणून केवळ २२ रुपये भरावे लागतील. मुख्य म्हणजे उर्वरित ३ वर्षांसाठी तुम्हाला कोणतेही प्रीमियम भरावे लागत नाही.

मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असायला हवे

लक्षात घ्या, एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीची वेळ मर्यादा ही तुमच्या मुलीच्या वयानुसार कमी करता येते. मात्र एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीच्या (LIC Kanyadan Policy) नियमांनुसार, तुमच्या मुलीचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न वयाच्या १८ व्या वर्षी करण्याचा विचार करत असाल तर ही पॉलिसी १७ वर्षांसाठी घेता येईल.

LIC कन्यादान पॉलिसी कशी घ्याल?

एलआयसी कन्यादान पॉलिसी घ्यायची असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या एलआयसी कार्यालयास भेट द्यावी लागेल. इथे तुम्हाला विकास अधिकाऱ्यांची भेट घ्यावी लागेल. सोबतच तुम्हाला तुमच्या परिसरातील एलआयसी एजंटशीदेखील संपर्क साधावा लागेल.

पॉलिसीसाठी लागणारी कागदपत्रे

तुम्हाला तुमच्या मुलींसाठी किंवा बहिणीसाठी एलआयसीच्या कन्यादान पॉलिसी घ्यायची असेल तर तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे द्यावी लागतील. यामध्ये मुलीचा जन्म दाखला, पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यांचा समावेश आहे. (LIC Kanyadan Policy)

तरच मिळतील ३१ लाख रुपये

एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये, नियमित १५१ रुपये भरल्यास तुम्हाला दरमहा ४५३० रुपये गुंतवावे लागतील. उदाहरण देऊन सांगायचं तर, तुमचा पगार १५ हजार रुपये असेल तर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर कन्यादान पॉलिसी घेऊ शकता. कारण तुम्हाला पुढे २२ वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. पुढे योजनेचा २५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ३१ लाख रुपये ही पूर्ण रक्कम दिली जाईल. (LIC Kanyadan Policy) अर्थात या योजनेंतर्गत तुम्हाला १५१ रुपयांची गुंतवणूक केल्यास योजनेच्या मॅच्युरिटीनंतर ३१ लाख रुपये मिळतील.