LIC Pension Plan : चाळिशीपार लोकांना LIC देणार पेन्शन; दरमहा मिळणार ‘इतके’ रुपये, कसा अर्ज कराल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Pension Plan) भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC कायमच भारतीय गुंतवणूकदारांसाठी नवनवीन योजना राबवत असते. आताही LIC ने एक खास आणि जबरदस्त योजना सुरु केली आहे. या योजनेमूळे चाळीस वयवर्षे पार केलेल्या लोकांना मोठा फायदा होणार आहे.

कारण या योजनेंतर्गत LIC कडून ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दरमहा १२ हजार रुपये पेन्शन स्वरूपात दिले जाणार आहेत. त्यामुळे आता म्हातारपण सुलभ करण्यासाठी LIC ची ही योजना फायदेशीर ठरणार असल्याचे दिसत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करता येईल? आणि ही योजना कसा लाभ देईल? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

कोण घेऊ शकत लाभ? (LIC Pension Plan)

LIC या योजनेचा लाभ केवळ भारताचा नागरिक असलेली व्यक्तीच घेऊ शकते. त्यात ही एक पेन्शन योजना आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत वृद्ध ग्राहकांना उच्च परतावा दिला जातो. यासाठी ४० वय वर्षापेक्षा जास्त आणि ८० वय वर्षापेक्षा कमी अशी वयोमर्यादा निश्चित केलेली आहे. या योजनेचा भाग झाल्यास ग्राहकाला दरमहा १२ हजार रुपये पेन्शन मिळू शकते.

कालावधी

LIC च्या या पेन्शन योजनेंतर्गत किमान १००० रुपये ते जास्तीत जास्तीत कमाल पेन्शनची मर्यादा निश्चित केलेली नाही. यात ३ महिने, ६ महिने किंवा १२ महिन्यांच्या कालावधीनंतर पेन्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. (LIC Pension Plan) या योजनेनुसार, पॉलिसी धारकास पॉलिसी घेतल्यानंतर तीचा कालावधी सुरु झाल्याच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या कालावधीनंतर गुंतवलेली रक्कम LIC कडून परत केली जाते. तसेच पॉलिसी सुरू झाल्यापासून ६ महिन्यांनंतर नॉमिनीलादेखील कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

तर आयुष्यभर दरमहा मिळेल १२, ३८८ रुपयांची पेन्शन

LIC च्या पेन्शन योजनेबद्दल आणखी एक खास बाब अशी की, समजा तुमचे वय ४२ वर्षे असे आणि तुम्ही या योजनेत ३० लाख रुपये गुंतवलात तर तुम्हाला आयुष्यभर दरमहा १२३८८ रुपयांची पेन्शन मिळत राहील. याबाबत सविस्तर आणि योग्य ती माहिती घेण्यासाठी तुमच्या नजीकच्या LIC कार्यालयाला भेट द्या. (LIC Pension Plan)