LIC Policy Loan : पर्सनल लोनपेक्षा घ्या LIC कडून कर्ज; EMI सुद्धा भरायची गरज नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Policy Loan) आजकाल कोणती वेळ कधी येईल आणि कशी येईल काही सांगता येत नाही. त्यात पैशाचं सोंग आणणं खायची गोष्ट नाही. ते म्हणतात ना, जगात सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग काही आणता येत नाही. एखाद्या आपत्कालीन परिस्थिती पैशाची मोठ्या प्रमाणावर गरज लागते. अशावेळी जमापुंजी वापरूनदेखील जेव्हा पैसा अपुरा पडतो तेव्हा आयुष्यातील मोठी हार झाल्यासारखे वाटते. कारण अशावेळी लोक हात उसने किंवा व्याजाने पैसे घेतात आणि कायमचे एखाद्याच्या ऋणाखाली येतात.

तर काही लोक बँकेतून वैयक्तिक स्वरूपातील लोन घेऊन वेळ काढतात. आता साहजिकच बँकेतून कर्ज घेतले तर ते फेडण्यासाठी विशिष्ट काळापर्यंत मासिक स्वरूपात निश्चित ईएमआय भरावे लागतात. या कर्जाचा व्याजदर देखील जास्त असतो. त्यामुळे आर्थिक भार असह्य होऊ शकतो. मग अशावेळी जर तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी (LIC Policy Loan) असेल तर तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकता. विशेष म्हणजे तुमच्या पॉलिसी वर घेतलेले कर्ज हे पर्सनल लोनपेक्षा स्वस्तात आणि कमी व्याजदरात मिळते. इतकंच नव्हे तर तुम्हाला ईएमआय देखील भरावा लागत नाही. हे कर्ज कसे घेता येईल? आणि त्यासाठी काय नियम असतात? हे जाणून घेऊया.

LIC पॉलिसीवरील मिळेल स्वस्त कर्ज (LIC Policy Loan)

जर तुम्ही LIC पॉलिसीवर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर लक्षात घ्या तुमचे कर्ज सुरक्षित श्रेणीत येते. कारण यात तुम्ही घेत असलेल्या कर्जाची हमी तुमची पॉलिसी देते. यासाठी तुम्हला काही फार कागदपत्रे द्यावी लागत नाहीत. शिवाय हे कर्ज लवकरात लवकर मिळते. त्यामुळे चिंतेचे कारण नाही.

या कर्ज सुविधेचा महत्वाचा फायदा असा की. तुमची LIC पॉलिसी सरेंडर करण्याची देखील गरज भासत नाही. म्हणजेच पॉलिसीवर कर्ज काढूनही विम्याचे लाभ आहेत तसेच राहतात. यात बदल होत नाही. (LIC Policy Loan) शिवाय हे कर्ज हे पर्सनल लोनपेक्षा स्वस्तात मिळते आणि यावर कोणतेही छुपे शुल्क वा प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे स्वस्त व्याजदरात हे कर्ज सर्व बाजूने फायदेशीर ठरते.

कुठे अर्ज कराल?

LIC पॉलिसीवर कर्ज घ्यायचे असल्यास ऑनलाईन वा ऑफलाईन प्रक्रियेचा वापर करता येतो. ऑफलाइनसाठी LIC कार्यालयात जाऊन KYC कागदपत्रांसह अर्ज दाखल करता येईल. तर ऑनलाइनसाठी LIC ई सेवांसाठी नोंदणी करून खात्यात लॉगइन करा आणि कर्जासाठीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरा.

परतफेडीचा कालावधी

LIC पॉलिसी वर कर्ज घेतल्यास त्याची परतफेड करण्याचा कालावधी बराच मोठा असतो. हा कर्ज परतफेडीचा कालावधी किमान ६ महिन्यांपासून ते विमा पॉलिसीची मुदत पूर्ण होईपर्यंत असू शकतो. (LIC Policy Loan) तसेच या कर्जावर दरमहा EMI भरावा लागत नाही. जसे पैसे येतील तसे थोडे थोडे भरता येतात. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, यात वार्षिक व्याजाची भर पडत असते.

कर्ज परतफेडीचे 3 पर्याय

LIC पॉलिसीवर घेतलेल्या कर्ज परतफेडीसाठी ३ पर्याय दिले जातात. ते खालीलप्रमाणे
1. संपूर्ण मुद्दल रक्कम व्याजासह परत करणे
2. विमा पॉलिसीच्या मुदत पूर्ण होण्याच्या वेळी दाव्याच्या रकमेसमोर रक्कम सेटल करणे
3. व्याजाची रक्कम दरवर्षी भरून मूळ रक्कम स्वतंत्रपणे परत करणे.

कर्जाचे नियम

1. हे कर्ज केवळ पारंपारिक आणि एडॉवमेंट सारख्या काही निवडक पॉलिसींवर दिले जाते.
2. सरेंडर मूल्य पाहून कर्जाची रक्कम ठरवली जाते. त्यामुळे पॉलिसीच्या सरेंडर मूल्यावर ८०% ते ९०% पर्यंत कर्ज मिळते.
3. पॉलिसीधारकाची प्रोफाइल पाहून १० ते १२ टक्क्यांचा व्याजदर दिला जातो. (LIC Policy Loan)
4. या कर्ज सुविधेत विमा कंपनी तुमची पॉलिसी गहाण ठेवते. त्यामुळे कर्जाची परतफेड केली नाही किंवा थकीत कर्जाची रक्कम पॉलिसीच्या सरेंडर मूल्यापेक्षा जास्त असेल तर तुमची पॉलिसी रद्द केली जाते.