हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । lic Sakhi Scheme – भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) विमा सखी योजनेला (lic Sakhi Scheme) महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ महिनाभरापूर्वी करण्यात आला होता. पहिल्याच महिन्यात 52,511 महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे, असे LIC ने सांगितले आहे. त्यामुळे LIC ची हि विशेष योजना महत्वाची ठरली आहे. तसेच या योजनेत महिलांना चांगले मानधनही प्राप्त होते. तर चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महिलांसाठी फायदेशीर योजना (lic Sakhi Scheme) –
LIC (lic Sakhi Scheme) ने आतापर्यंत 27,695 विमा सखींना नियुक्तीपत्रे दिली असून, त्यापैकी 14,582 महिलांनी विमा पॉलिसी विक्री सुरू केली आहे. या योजनेतून महिलांना सशक्त करत देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान एक विमा सखी नेमण्याचे उद्दिष्ट आहे. एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मोहंती यांच्या मते , विमा सखींना डिजिटल साधनांसह सक्षम केले जात असून, व्यवसायातून कमिशन मिळण्यासोबतच तीन वर्षांसाठी मासिक मानधनही दिले जाणार आहे. त्यामुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळण्यास मदत होईल.
कार्यक्षमतेनुसार मासिक मानधन –
योजनेनुसार, विमा सखींना त्यांच्या कार्यक्षमतेनुसार मासिक मानधन दिले जाणार आहे. पहिल्या वर्षी त्यांना 7000 रुपये प्रति महिना मानधन मिळणार आहे, दुसऱ्या वर्षी हे मानधन 6000 रुपये प्रति महिना होईल, आणि तिसऱ्या वर्षी ते 5000 रुपये प्रति महिना असे कमी होईल. यासोबतच, विमा पॉलिसी विक्रीवर त्या सखींना कमिशन देखील दिले जाईल. या योजनेद्वारे, एलआयसीचे (lic Sakhi Scheme) उद्दिष्ट आहे की पुढील तीन वर्षांत 2 लाख विमा सखींना भरती करणे, ज्यामुळे विमा क्षेत्रातील पोहोच आणि कार्यक्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट साधता येईल.
योजनेसाठी वयोमर्यादा –
या योजनेसाठी 18 ते 70 वर्षे वयोगटातील दहावी उत्तीर्ण महिला अर्ज करू शकतात. देशभरातील महिलांना अर्थसाक्षरता आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने नेणारी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हे पण वाचा : सरकारचा मोठा निर्णय ; शासकीय निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंबांसाठी नवी तरतूद