LIC Saral Pension Scheme : LIC च्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक केल्यास मिळेल लाइफटाइम पेन्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Saral Pension Scheme) आजकाल पैसा कमावणे आणि गुंतवणे दोन्ही गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे काही वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे जसजसा काळ बदलत चालला आहे लोकांमध्ये गुंतवणुकीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होत आहे. आज कित्येक लोक सरकारी योजना ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. यातही अनेक गुंतवणूकदारांची पहिली पसंती ही LIC ला मिळतेय.

त्यामुळे आजच्या घडीला LIC च्या योजनांचा लाभ घेणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या प्रचंड मोठी आहे. दरम्यान, आज आपण सेवानिवृत्त लोकांचे आयुष्यभराचे आर्थिक टेन्शन संपवणाऱ्या पेन्शन स्कीमबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यात केवळ एकदाच गुंतवणूक केली असता लाइफटाईम पेन्शन दिली जाते. या योजनेचे नाव LIC सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Scheme) असे आहे. चला याविषयी अधिक जाणून घेऊया.

LIC सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Scheme)

LIC ची सरल पेन्शन योजना ही एक अशी योजना आहे, जी सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शनची खात्री देते. या योजनेत केवळ एकदाच गुंतवणूक करावी लागते. या गुंतवणुकीवर या योजनेंतर्गत तुम्हाला आयुष्यभर पेन्शन दिली जाते. त्यामुळे खाजगी वा सरकारी क्षेत्रात कार्यरत लोकांमध्ये ही LIC सरल पेन्शन योजना खूप पसंत केली जातेय. कारण, अशा लोकांनी त्यांच्या पीएफ फंडातून मिळालेली रक्कम आणि ग्रॅच्युइटीची रक्कम सेवानिवृत्तीआधीच या योजनेत गुंतवली तर त्यांना आयुष्यभर प्रत्येक महिन्याला पेन्शनचा लाभ मिळतो.

कोण गुंतवणूक करू शकतो?

LIC सरल पेन्शन योजनेट ४० वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती गुंतवणूक करू शकत नाही. मात्र, पुढे ८० वर्षापर्यंतची कोणतीही व्यक्ती कधीही यामध्ये गुंतवणूक करू शकते. (LIC Saral Pension Scheme) यात तुम्ही तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करू शकता आणि प्रतिमहिना पेन्शनचा लाभ घेऊ शकता. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला प्रीमियम भरल्यानंतर वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक आधारावर पेन्शन मिळते.

दरमहा किती पेन्शन मिळेल?

LIC च्या सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करताना तुम्हाला वार्षिक स्वरूपात किमान १२ हजार रुपयांची खरेदी करावी लागेल. यामध्ये अधिकाधिक गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. (LIC Saral Pension Scheme) त्यामुळे कितीही गुंतवणूक करता येईल. उदाहरण म्हणून एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार, समजा ४२ वर्षीय व्यक्तीने ३० लाख रुपयांची वार्षिकी खरेदी केली असेल तर त्या व्यक्तीस प्रत्येक महिन्याला १२,३८८ रुपये पेन्शन दिली जाईल.

योजनेवर कर्ज सुविधा उपलब्ध

LIC च्या सरल पेन्शन योजनेची एक खासियत अशी की, या योजनेवर तुम्हाला कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे. समजा पॉलिसी धारकाच्या कुटुंबातील कोणी वाजती गंभीर आजारी असेल तर या पॉलिसीच्या खरेदीनंतर ६ महिन्यांचा कालावधी पूर्ण होताच ही पॉलिसी सरेंडर करता येईल. तसेच, पॉलिसी सुरू केल्यापासून ६ महिने पूर्ण झाले असता यावर कर्ज घेता येईल. (LIC Saral Pension Scheme) याबाबत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी LIC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.