LIC Scheme For Women : महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; 58 रुपयांच्या गुंतवणुकीतून जमा करा 8 लाखांचा फंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Scheme For Women) भारतामध्ये एलआयसी ही पॉलिसी सर्व्हिसिंग आणि व्यवसाय ऑपरेशन्ससाठी माहिती तंत्रज्ञानाचा फायदा घेणारी एक अग्रणी संस्था आहे. जिच्या माध्यमातून गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जातात. जे भविष्यात सहाय्यक आर्थिक पूल म्हणून काम करतात. एलआयसी आपल्या पॉलिसीधारकांना विविध पर्यायातून विविध गुंतवुणकीच्या सुविधा प्रदान करते. ज्यामध्ये ग्राहकांना कमी गुंतवणूक करून सुरक्षितता, जोखीममुक्त आणि खात्रीशीर परतावा मिळतो.

आजकाल पैशांची बचत आणि गुंतवणूक अत्यंत महत्वाची झाली आहे. उद्याचा दिवस कुणी पाहिला आहे? म्हणून आजच भविष्यासाठी ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. (LIC Scheme For Women) आपण केलेली गुंतवणूक ही आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य देते. तसेच गरजेच्या वेळी मदतीला येते आणि म्हणून आज महिला गुंतवणूकदारांची संख्या देखील मोठी असल्याचे दिसत आहे. कारण महिलांसाठीही पैशांची बचत खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे एलआयसी आधार शिला योजना ही महिलांमध्ये लोकप्रिय ठरते आहे. ही योजना कशी काम करते आणि कसा लाभ देते ते जाणून घेऊया.

LIC आधार शिला योजना म्हणजे आर्थिक सुरक्षा (LIC Scheme For Women)

एलआयसी म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळाने फक्त आणि फक्त महिलांसाठी आधार शिला योजना आणली आहे. ही एक एंडॉवमेंट पॉलिसी आहे. या पॉलिसीमुळे जीवन संरक्षणासह बचतीचा लाभ देखील मिळतो. यातून पॉलिसी धारक महिलेच्या अनुपस्थितीत तिच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देखील प्रदान केली जाते. LIC आधार शिला योजनेत गुंतवणूक करणाऱ्या महिलांचे वय ८ वर्षे ते ५५ वर्षे असू शकते.

या योजनेचा परिपक्वता कालावधी हा १० वर्ष ते २० वर्षांपर्यंत असतो. पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर चांगला परतावा मिळतो. (LIC Scheme For Women) या योजनेत मासिक प्रीमियम किमान ५००० रुपये भरणे आहे. वयाच्या २० व्या वर्षांपासून जर तुम्ही २० वर्षांसाठी पॉलिसी खरेदी केलीत तर तुम्हाला दररोज ५८ रुपये वाचवता येतील आणि जवळपास ८ लाख रुपयांपर्यंतचा निधी तयार करता येईल.

LIC आधार शिला योजनेचे फायदे

फक्त महिलांसाठी सुरु करण्यात आलेली LIC आधार शिला योजना भविष्यात आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचे काम करते. या योजनेमुळे महिलांना अनेक लाभ मिळतात. ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

या योजनेंतर्गत महिला आपल्या सोयीनुसार मासिक, सहामाही किंवा वार्षिक अशाप्रकारे प्रीमियम भरू शकतात.

या योजनेत २ वर्षांच्या गुंतवणुकीनंतर ते सरेंडर देखील करता येतात. (LIC Scheme For Women)

योजनेच्या परिपक्वतेदरम्यान गुंतवणूकदारांना मूळ विमा रक्कम आणि लॉयल्टी ॲडिशनचा लाभ मिळतो.

याशिवाय महत्वाचे म्हणजे गुंतवणूकदारास गरज असल्यास कर्जाचादेखील लाभ दिला जातो.