हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यांना पेंशन सुरु आहे , त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. आता पेंशनधारकांनी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपले जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्हाला कोणती पेंशन भेटत असेल आणि तुम्ही हे सर्टिफिकेट जमा केले नसेल तर सरकारकडून पुरवण्यात येणारी पेंशन बंद होऊ शकते. जीवन प्रमाणपत्र हे पेंशनधारक जिवंत असल्याचा पुरावा देते असते , त्यामुळे ती व्यक्ती जीवित आहे तसेच तिला ती पेंशन मिळाली पाहिजे असे मानले जाते . त्यामुळे हे प्रमाणपत्र दरवर्षी 30 नोव्हेंबर या कालावधीत सादर करणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र जमा करण्यासाठी काहीच दिवस उरले आहे.
जीवन प्रमाणपत्र बंधनकारक –
जीवन प्रमाणपत्र हे पेंशनधारकांच्या जिवंत असल्याचा पुरावा म्हणून सादर केले जाते . पेंशनधारकांना त्यांचा पेंशन वितरित करणाऱ्या संस्थेत, बँकेत , सरकारी मान्यताप्राप्त सेवा केंद्र ,जिल्हा कोषागार कार्यालय तसेच पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे प्रमाणपत्र सादर करावे लागते. आता डिजिटल जीवन प्रमाण (Digital Life Certificate) सुविधेमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. जर आरोग्य समस्येमुळे बँकेत जाणे अशक्य असल्यास, पेंशनधारक डोअरस्टेप सेवा घेऊ शकतात. सेवा मिळवण्यासाठी बँक प्रतिनिधीला घरी बोलावण्याची विनंती करा. त्यानंतर प्रतिनिधी बायोमेट्रिक डेटा घेऊन प्रमाणपत्र सादर करतील. डिजिटल जीवन प्रमाण सेवा ही अधिक सोयीस्कर आहे.
सर्टिफिकेट जमा करण्याचे विविध ऑपशन –
जीवन प्रमाणपत्र जमा करण्याच्या विविध ऑपशनपैकी नागरिक सेवा केंद्र (CSC) हा एक असून , त्यानंतर जीवन प्रमाण पोर्टलवर लॉगिन करून फिंगरप्रिंट रीडरचा वापर करून प्रमाणपत्र जमा करता येईल, किंवा जीवन प्रमाण अॅप डाउनलोड करून ऑनलाइन प्रमाणपत्र सादर करता येते. याशिवाय पोस्ट ऑफिस सेवेद्वारे पोस्टमनच्या मदतीने देखील प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आधार फेस आरआयडी आणि जीवन प्रमाण अॅपच्या सहाय्याने फेस ऑथेंटिकेशनद्वारे प्रमाणपत्र जमा करण्याचा एक पर्याय आहे. जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर केल्यास पेंशन नियमितपणे मिळवता येईल. म्हणून पेंशनधारकांनी 30 नोव्हेंबरपूर्वी आपले प्रमाणपत्र सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यांची पेंशन न थांबता वेळेवर मिळू शकेल.