Lingmala Waterfall : पावसाळ्यात पर्यटकांवर मोहिनी टाकतोय ‘हा’ सुंदर धबधबा; तुम्हीही आवडत्या व्यक्तीसोबत नक्की जा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lingmala Waterfall) पावसाळ्याच्या दिवसात डोंगर, कड्या कपाऱ्यांमधून अत्यंत सुंदर असे लहान मोठे धबधबे कोसळत असतात. त्यांचे विहंगम दृश्य निसर्गाच्या सौंदर्यात विशेष भर टाकणारे असते. असे धबधबे पाहताना एक वेगळाच आनंद होतो. जो मनावरील ताण कधी कमी करतो ते कळतसुद्धा नाही. पश्चिम महाराष्ट्रात असे अनेक धबधबे आहेत. ज्यांचे प्राकृतिक सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतं. त्यात पावसाळ्याच्या दिवसात या धबधब्यांचे सौंदर्य आणखीच खुलून येते आणि त्यामुळे पर्यटक आपोआप या धबधब्यांकडे आकर्षित होतात. यापैकी एक धबधबा म्हणजे ‘लिंगमळा’. चला तर या सुंदर धबधब्याविषयी अधिक माहिती घेऊया.

कुठे आहे?

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला की, बरेच लहान मोठे धबधबे प्रवाहित होऊ लागतात. मात्र, काही धबधबे हे विशेष आकर्षण असतात. जसे की, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधला ‘लिंगमळा धबधबा’. (Lingmala Waterfall) महाबळेश्वर हे सर्वाधिक भेट दिले जाणारे एक अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. महाबळेश्वरचे सौंदर्य डोळ्यात साठवून घ्यावे इतके सुंदर आहे. तर महाबळेश्वरमध्ये स्थित असलेला ‘लिंगमळा धबधबा’ याच सुंदरतेचा एक भाग आहे. त्यामुळे प्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या धबधब्यांमध्ये या धबधब्याचा समावेश आहे.

लिंगमळा धबधबा (Lingmala Waterfall)

महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधब्याचा मुख्य स्त्रोत वेण्णा व्हॅली आहे. जिथून सुमारे ६०० फूट उंचीवरून पाणी कोसळते आणि त्यानंतर या ठिकाणी पर्यटकांना एक अत्यंत सुंदर, नेत्रदीपक असे दृश्य पहायला मिळते. लिंगमळा धबधबा हा समुद्र सपाटीपासून १२७८ मीटर उंचीवर आहे. या ठिकाणी बऱ्याचवेळा सुंदर इंद्रधनुष्य देखील पहायला मिळते. सध्या राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे, लिंगमळा धबधबा तुडुंब होऊन कोसळतो आहे. त्यामुळे हा धबधबा महाबळेश्वरमध्ये पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरू पाहतोय.

कसे जाल?

लिंगमळा धबधब्याकडे जाण्यासाठी तुम्हाला महाबळेश्वर बसस्थानकापासून केवळ ६ किलोमीटर अंतर प्रवास करावा लागेल. इथून लिंगमळा धबधब्यापर्यंत बरेच लोक स्थानिक वाहतुकीने प्रवास करतात. (Lingmala Waterfall) त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार प्रवासाचा पर्याय निवडू शकता. इथे जाण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रायव्हेट गाड्यांचासुद्धा वापर करू शकता.