घरबसल्या डीमॅट अकाउंट Aadhaar शी लिंक करा; जाणून घ्या सोपी पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेअर बाजारात अन म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. सेबी (SEBI) ने डीमॅट अकाऊंट आधाराशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. जर तुमचे डीमॅट अकाऊंट आधाराशी लिंक केलेले नसेल, तर ब्रोकर्सला त्या अकाऊंटला फ्रीझ करावे लागेल आणि आधार लिंक होईपर्यंत कोणतेही व्यवहार शक्य होणार नाहीत. पण तुम्ही घरबसल्याही ऑनलाईन पद्धतीने डीमॅट अकाऊंटला आधारशी लिंक करू शकता. डीमॅट अकाऊंटला आधाराशी जोडण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे तुमची ट्रेडिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होते. त्यामुळे, तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल, तर लवकरच तुमचे डीमॅट अकाऊंट आधाराशी लिंक करा, ज्यामुळे तुमच्या ट्रेडिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तर चला यासाठी सोपी पद्धत जाणून घेऊयात.

डीमॅट अकाऊंट आधारशी लिंक –

NSDL (www.nsdl.co.in) किंवा CDSL (www.cdslindia.com) च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
तिथे आधारला डीमॅट अकाऊंटशी लिंक करण्याचा पर्याय निवडा आणि दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
आता तुम्हाला डीपी नाव, डीपी आयडी, क्लायंट आयडी आणि पॅन नंबर यांसारखी माहिती भरावी लागेल.
माहिती सबमिट केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल आणि ईमेलवर OTP येईल. त्याला वेबसाइटवर टाका.
त्यानंतर तुमच्या डीमॅट अकाऊंटची माहिती स्क्रीनवर दिसेल. तुम्हाला नाव, पत्ता, मोबाइल नंबर, लिंक केलेला बँक अकाऊंट आणि ईमेल यांसारखी माहिती पडताळून पाहावी लागेल.
त्यानंतर आधार नंबर, लिंग आणि जन्मतारीख भरून पुढे जा.
UIDAI कडून आलेला OTP टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला SMS आणि ईमेलद्वारे कन्फर्मेशन मिळेल.

आवश्यक कागदपत्रे –

आधार नंबर डीमॅट अकाऊंटशी लिंक करायचा असेल, तर ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी काही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. यात आधार कार्ड, पॅन कार्ड, डीमॅट अकाऊंट डिटेल्स (डीपी आयडी आणि क्लायंट आयडी), नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी यांचा समावेश आहे. हे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.