Luni River : भारतातील एकमेव खारी नदी; जी समुद्रात विलीन होत नाही, मग कुठे जाते?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Luni River) आपल्या देशातील नद्या विविध राज्य, जिल्हे, गावांना पाणी पुरवत खळखळून वाहत आहेत. आपण लहानपणापासून ऐकत आलेल्या गोष्टी, पुस्तकातील धडे आपल्याला अनेक नद्या डोंगरातून उगम पावतात आणि समुद्राला जाऊन मिळतात असे सांगतात. वेगवेगळ्या भागातून वाहणाऱ्या नद्या शेवटी समुद्रालाच मिळतात, हे निसर्ग चक्र आहे. पण भारतात मात्र या निसर्ग चक्राच्या उलट वाहणारी एक नदी आहे. जी डोंगरातून उगम तर पावते पण समुद्राला जाऊन कधीच भेटत नाही. मग ही नदी जाते तरी कुठे? हा प्रश्न गेल्या कित्येक शतकांपासून अनुत्तरित आहे. चला तर या अनोख्या नदीविषयी जाणून घेऊया.

ही कोणती नदी आहे?

भारतातील अत्यंत वेगळी आणि रहस्यमयी नदी म्हणून ‘लुनी नदी’ (Luni River) ओळखली जाते. लवणाद्रि किंवा संस्कृत शब्द लवणगिरी यापासून ‘लुनी’ या शब्दाची निर्मिती झाली आहे. लुनी म्हणजे काय? तर लुनी म्हणजे खाऱ्या पाण्याची नदी. होय. तुम्ही अगदी बरोबर समजताय. या लुनी नदीचे पाणी अतिशय खार आहे. माहितीनुसार, लुनी नदीचा उगम हा अजमेर प्रदेशातील अरावलीच्या नागा पर्वतरांगांमध्ये होतो. समुद्रसपाटीपासून सुमारे ७७२ मीटरच्या उंचीवर नागा पर्वतावर ही नदी उगम पावते.

खाऱ्या पाण्याची नदी (Luni River)

सामान्यपणे नद्यांचे पाणी हे गोडे असते आणि या पाण्यावर अनेक सजीव उदरनिर्वाह करत असतात. आपली तहान भागवत असतात. मात्र, भारतातील लुनी नदी ही खाऱ्या पाण्याची एकमेव नदी आहे. जिच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे तिचे पाणी खारट आहे. त्यामुळे या नदीचे पाणी कुणीही पिऊ शकत नाही.

साहित्यात आहे उल्लेख

प्राचीन काळी कवी कुलगुरू कालीदास यांच्या साहित्यात लुनी नदीच्या (Luni River) नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. कालिदासांनी या नदीला ‘अंत:सलिला’ असे म्हटले आहे. या नदीला त्या काली ‘लवणवती’ या नावाने ओळखले जायचे. तर अजमेर क्षेत्रात या नदीला ‘सागरमती’ म्हणून ओळखले जाते. अजमेर जिल्ह्यात उगम पावणारी लुनी नदी ही पुढे दक्षिण- पश्चिम दिशेला गुजरात राज्याकडे वळते आणि नागौर, जोधपूर, पाली, बाडमेर आणि जालोरपासून पुढे कच्छ रणात येऊन थांबते.

लुनी नदी समुद्रात विलीन होत नाही, मग कुठे जाते?

आपण सारेच जाणतो की, राजस्थानमध्ये पावसाचे प्रमाण फार कमी आहे. या ठिकाणी कडक आणि तीव्र स्वरूपाचा कायम उन्हाळा असतो. त्यामुळे येथे तापमानसुद्धा जास्त असते. अशा ठिकाणी लुनी नदी कच्छच्या वाळवंटात येऊन थांबते. यानंतर काही काळात ती लुप्त होते. यामागील कारण असे की, लुनी नदीला मुळातच पाणी कमी आहे. (Luni River) त्यात राजस्थानमधील भूप्रदेशात वाळूचे प्रमाण खूप जास्त असल्याने पाणी जमिनीत झिरपत नाही. तर जास्त तापमानामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते आणि परिणामी लुनी नदी लुप्त होते. यामुळे लुनी नदी समुद्राला जाऊन मिळत नाही.