Mahabaleshwar Tourism : राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाने जोर पकडला आहे. मागच्या दोन-तीन दिवस सतत या भागात पाऊस बरसत आहे. अशातच जर तुम्ही पावसाळी ट्रिप साठी महाबळेश्वरला जाण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
महाबळेश्वर येथे पावसाचा जोर वाढल्यामुळे काही पर्यटन स्थळं ही पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. यापैकीच एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे लिंगमळा धबधबा… लिंगमळा धबधबा पर्यटनासाठी प्रशासनाने तात्पुरता (Mahabaleshwar Tourism) बंद केला आहे. या धोकादायक पर्यटन स्थळाकडे जाळण्याचे टाळा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
खरंतर वेण्णा नदीवरचा पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्यामुळे महाबळेश्वर येथील प्रसिद्ध असा लिंगमळा धबधबा ओसंडून वाहत असून धबधब्याने राऊडर रूप धारण केले आहे. याठिकाणी पर्तकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पर्यटनासाठी हा धबधबा बंद करण्यात आला आहे. धोकादायक ठिकाणी काटेरी तारा व काटेरी झुडपं टाकून येथे बंदी घालण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये एकूणच दमदार पाऊस झालेला आहे. त्यामुळे नदी नाले भरून वाहत आहेत अशातच धबधब्यांनी देखील रौद्ररूप धारण केले आहे. लिंगमळा धबधबा हा सध्या ओसंडून पाहत आहे. जरी निसर्गाचे हे देखणं रूप असलं तरी सुद्धा जीवाची (Mahabaleshwar Tourism) पर्वा न करता इथे जाणं हे धोकादायक ठरू शकतं म्हणून जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
महाबळेश्वर हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्यामुळे अनेक पर्यटक महाबळेश्वरला जाणं पसंत करतात. मात्र लिंगमळा धबधब्याप्रमाणेच महाबळेश्वर मध्ये असणाऱ्या ऑर्थो सीट पॉईंट (नीडल पॉईंट ) परिसरात देखील पर्यटकांना जाण्यासाठी मज्जाव (Mahabaleshwar Tourism) करण्यात आला आहे.
दरम्यान सातारा जिल्ह्यात हवामान विभागांवर रेड अलर्ट जारी केला असून शुक्रवार पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जर पावसाळी पर्यटनासाठी महाबळेश्वरला जात असाल तर प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा (Mahabaleshwar Tourism) आणि शक्यतो पावसाळ्यात धोकादायक पर्यटन स्थळी जाणे टाळा