Mahakumbh 2025 : महाकुंभामुळे विमान कंपन्या मालामाल ! भाविकांच्या खिशाला मात्र कात्री

0
2
Mahakumbh 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mahakumbh 2025 : यंदाच्या वर्षीचा उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु झालेलाच महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा महामेळा मानला जात आहे. या मेळ्यात केवळ भारतच नाही तर परदेशातील लाखो भक्त सहभागी होण्यासाठी आले आहेत. प्रत्येक 12 वर्षांनी आयोजित केला जाणारा हा भव्य सोहळा एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक टप्पा मानला जातो, जो भक्तांना गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नदी यांच्या पवित्र संगम स्थळी (Mahakumbh 2025) आकर्षित करतो.

४५ दिवस चालणाऱ्या या महाकुंभ मेल्यात ४०० मिलियनाहून अधिक भक्त सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी (Mahakumbh 2025) एक बनणार आहे. १० वेगवेगळ्या देशांतील प्रतिनिधी, ज्यामध्ये आध्यात्मिक नेते आणि सांस्कृतिक दूतांचा समावेश आहे, ते या पवित्र स्नानात सहभागी होणार आहेत. यामुळे या सोहळ्याची सार्वभौम आकर्षण आणखी वाढणार आहे.

या महासोहळ्यामुळे उत्तरप्रदेशच्या आर्थिक उलाढालाईट सुद्धा मोठा फरक पडतो आहे. यामुळे येथील आर्थिक विकासाला चालना मिळत आहे. एवढेच नाही तर यामुळे विमान कंपन्या सुद्धा मालामाल झाल्या आहेत. विमान कंपन्यांनी (Mahakumbh 2025) आपले भाडे वाढवले असून त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यासंदर्भातला एक अहवाल समोर आला आहे.

इक्सिगो अहवालानुसार लखनऊ आणि वाराणसी या प्रयागराज जवळील शहरांचे हवाई भाडे तीन ते 21 टक्क्यांनी वाढले आहे. प्रयागराजसाठी विमान तिकीट बुकिंग मध्ये 162 टक्क्यांनी वाढ झाली असून लखनऊ आणि वाराणसी साठी बुकिंग अनुक्रमे 42 टक्के आणि 127 टक्क्यांनी वाढले आहे. हे आकडे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या बुकिंग कालावधीतले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार 20 पेक्षा जास्त ठिकाणाहून थेट प्रयागराजला (Mahakumbh 2025) भाविक येत आहेत. महत्त्वाच्या स्नान तारखांच्या आधीचे प्रवासाचे भाडेही वाढत आहे. उदाहरणार्थ 27 जानेवारी रोजी मुंबईसारख्या प्रमुख महानगरांमधून थेट उड्डाणांचे भाडे 27 हजार रुपये आहे. तर 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंत प्रयागराजाला जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग ही वाढले आहे. याचा फटका मात्र भाविकांना बसतो आहे.

शहरे आणि भाडेवाढ

भोपाळहून येणाऱ्या भाविकांसाठी विमानच्या भांड्यामध्ये तब्बल 498% वाढ झाली असून 17,796 रुपये तिकीट आहे. तर बंगळूर होऊन येणाऱ्या भाविकांसाठी 89% भाडेवाढ झाली असून 11,158 तिकीट आहे. तर अहमदाबादहून येणाऱ्या नागरिकांसाठी 41 टक्के भाडेवाढ झाली असून दहा हजार 364 दर आहे. तर दिल्लीहून येणाऱ्या भाविकांसाठी 584 रुपये तिकीट दर असून भाडेवाढ 21% झाली आहे. तर मुंबईहून येणाऱ्या नागरिकांसाठी 6381 तिकीट दर असून 13 टक्के भाडेवाढ झाली आहे.