Mahakumbh 2025 : सध्या देशभरामध्ये सर्वात मोठी चर्चा आहे ती प्रयागराज इथे संपन्न होणाऱ्या महा कुंभमेळ्याची तब्बल बारा वर्षांनी या कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण देश-विदेशातून इथं साधू, संत, महंत, भाविक उपस्थित होत असतात. 44 दिवस चालणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त हजेरी लावत असतात. दरम्यान पुणे शहरातून सुद्धा प्रयागराज साठी जाणाऱ्या भाविक भक्तांची मोठी गर्दी होत असते आणि म्हणूनच हीच बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आला असून पुण्याहून कुंभमेळ्यासाठी (Mahakumbh 2025) विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुणे ते माऊ कुंभमेळा (Mahakumbh 2025) स्पेशल ट्रेन ही 16 आणि 24 जानेवारी 6, 8 आणि 21 फेब्रुवारी या दिवशी पुण्याहून सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सुटणार आहे. तर पुढच्या दिवशी रात्री अकरा वाजता पोहोचणार आहे.
रेल्वे कडून दिलेल्या माहितीनुसार पुणे ते माऊ दरम्यान या विशेष गाडीच्या एकूण पाच फेऱ्या होणार आहेत तसेच मऊ पुणे कुंभमेळा विशेष गाडी माऊ इथून 17, 25 जानेवारी आणि 7, 9 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुटणार असून तिसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून 45 मिनिटांनी पुण्याला पोहोचणार आहे. परतणाऱ्या गाडीच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत. अर्थातच या विशेष गाडीच्या पुणे ते मऊ दरम्यान पाच आणि नऊ ते पुणे अशा चार फेऱ्या होणार आहेत या गाडीला महत्त्वाच्या स्थानावर थांबा देखील मिळणार आहे.
‘या’ स्थानकांवर घेणार थांबा (Mahakumbh 2025)
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या गाडीला दोन्ही बाजूने दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडोबा, तलवडिया, छानेरा खिरकीया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छियोकी, चुनार, वाराणसी, शहागंज आणि आझमगड या स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे.