हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mahakumbh 2025- प्रयागराज येथे मौनी अमावस्येच्या पवित्र दिनी गंगा घाटावर स्नान करण्यासाठी गेलेल्या 30 भाविकांचा महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. बॅरिकेट्स हटल्याने भाविक एकमेकांवर पडले, आणि या चेंगराचेंगरीत 90 हून जास्त भाविक जखमी झाले. या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने भविष्यात अशा प्रकारच्या घटनांचा पुनरावृत्ती टाळण्यासाठी काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महाकुंभ परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच व्हीव्हीआयपी (VVIP) पास रद्द करण्यात आले आहेत, ज्यामुळे कोणत्याही विशेष पासद्वारे वाहनांना मेळा परिसरात प्रवेश मिळणार नाही. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
वाहनांना 4 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशबंदी (Mahakumbh 2025) –
प्रयागराजमधील लागणाऱ्या जिल्ह्यांमधून येणारी वाहने जिल्ह्याच्या सीमेवर थांबवली जात आहेत, आणि शहरात चारचाकी वाहनांना 4 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. महाकुंभ परिसरात वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. विक्रेत्यांच्या व्यवसायाचे व्यवस्थापन करताना वाहतूक सुरळीत ठेवण्याचे निर्देशही दिले गेले आहेत.
प्रयागराज मार्गांवर गस्त वाढविण्याच्या सूचना –
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या परिस्थितीत पोलिस अधिकाऱ्यांना अयोध्या-प्रयागराज, कानपूर-प्रयागराज(Mahakumbh 2025), फतेहपूर-प्रयागराज, लखनौ-प्रतापगढ-प्रयागराज, आणि वाराणसी-प्रयागराज मार्गांवर गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच परतीच्या सर्व मार्गांवर कुठलीही अडचण येऊ नये याची काळजी घेण्याचे सांगितले.पुढील दोन दिवसांत लाखो भाविक वाराणसी, अयोध्या, चित्रकूट, आणि मिर्झापूर येथे प्रार्थना करण्यासाठी पोहोचणार आहेत, आणि त्यासाठी या शहरांमध्ये सतत दक्षता ठेवावी लागेल. या काळात, भाविकांच्या आरामासाठी प्रत्येक ठिकाणी अन्न व पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
हे पण वाचा : मोठी बातमी !!! क्लॅटच्या धर्तीवर Law CET परीक्षा 150 ऐवजी 120 गुणांसाठी घेतली जाणार
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज




