Mahakumbh 2025: महाकुंभमेळावाच्या निमित्ताने अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार

Mahakumbh 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mahakumbh 2025 –13 जानेवारी म्हणजेच आजपासून श्रद्धा, धर्म आणि परंपरा यांचा अद्भुत संगम असलेल्या महाकुंभला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या कुंभसाठी यंदा 45 कोटींहून अधिक भाविक संगम शहरात पोहोचण्याची शक्यता आहे. पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करून असंख्य भाविक मोक्षाची कामना करताना दिसतील . या भव्य धार्मिक कार्यक्रमाचे महत्त्व केवळ आध्यात्मिक असलेले नाही, तर यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा बूस्टर डोस मिळणार आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आर्थिक प्रगतीतही महत्वपूर्ण भूमिका –

महाकुंभाचा (Mahakumbh 2025) शुभारंभ 13 जानेवारीपासून झाला असून, हा आयोजन 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यावेळी जगभरातून लाखो भाविक प्रयागराजच्या संगमावर येणार आहेत. हे महाकुंभ धार्मिक असण्यासोबतच देशाच्या आर्थिक प्रगतीतही महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. महाकुंभात येणाऱ्या संत, महात्मे आणि श्रद्धावानांसाठी येथे पायाभूत सुविधा, वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता यासारख्या व्यवस्थांचा समन्वय साधला गेला आहे.

7000 कोटी रुपयांचे बजेट निश्चित (Mahakumbh 2025)

महाकुंभाच्या आयोजनासाठी 7000 कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये प्रयागराज शहराच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या आहेत. 421 प्रकल्पांवर काम करण्यात आले असून, शहरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, स्वच्छता आणि भाविकांची सोयीसुविधा यांचे व्यवस्थापन सुलभ करण्यात आले आहे.

अर्थव्यवस्थेला मोठा फायदा ( Indian Economy)-

महाकुंभाच्या आयोजनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला एक मोठा फायदा मिळण्याची आशा आहे. उद्योगजगताच्या अंदाजानुसार, या 45 दिवसांच्या महाकुंभात अंदाजे 4 लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय होऊ शकतो. सुमारे 40 ते 45 कोटी पर्यटक या महाकुंभात (Mahakumbh 2025)सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा समावेश असेल. प्रत्येक पर्यटकाने सरासरी 5,000 ते 10,000 रुपये खर्च केल्यास हा कार्यक्रम अर्थव्यवस्थेला ( Indian Economy) मोठा फायदा होईल.

भारतीय आणि परदेशी कंपन्यांचा सहभाग –

महाकुंभाच्या आयोजनात भारतीय आणि परदेशी कंपन्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येईल. फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG), फार्मा सेक्टर, मोबिलिटी प्रोव्हायडर, डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म यासारख्या कंपन्या या कार्यक्रमात आपल्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी लाखो रुपये खर्च करण्याची शक्यता आहे. महाकुंभाच्या आयोजनासाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ने सुमारे 45,000 टन स्टीलचा पुरवठा केला आहे. या स्टीलचा वापर महाकुंभाच्या बांधकामासाठी करण्यात आला आहे, ज्यामध्ये चेकर्ड प्लेट, हॉट स्ट्रीप मिल प्लेट आणि माइल्ड स्टील प्लेट यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या महाकुंभामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला एक सकारात्मक चालना मिळणार असून, याचा प्रभाव केवळ स्थानिक नाही, तर राष्ट्रीय स्तरावर देखील जाणवेल.

हे पण वाचा : 1 तासाचे अंतर 15 मिनिटांत कापणार ; श्रीनगर ते सोनमर्ग-लडाख बोगद्याचे आज मोदींच्या हस्ते उदघाटन