Mahakumbh Mela Stampede : महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी!! 17 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

0
2
Mahakumbh Mela Stampede
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mahakumbh Mela Stampede – महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी!! 17 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी प्रयागराज (Uttar Pradesh) 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यात आज म्हणजेच 29 जानेवारी रोजी, मौनी अमावस्येच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास त्रिवेणी संगमाजवळ हि घटना घडली आहे , ज्यात अनेक जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, 50 हून अधिक जण जखमी झाले असून, 17 जणांचा मृत्यू झाला आहे , असा अंदाज बांधला जात आहे. तर चला या ठिकाणी नक्की काय घडलं हे पाहुयात.

शाही स्नान रद्द करण्यात आले (Mahakumbh Mela Stampede)

महाकुंभमेळा प्रशासनाने तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर सुरू केला असून, जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. घटनेनंतर महाकुंभ प्रशासनाने आखाडा परिषदेला अमृत स्नान थांबवण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी होणारे शाही स्नान रद्द करण्यात आले आहे.

प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी –

महाकुंभच्या (Mahakumbh 2025) या वर्षी सुमारे 10 कोटी भाविकांची उपस्थिती अपेक्षित होती. त्यातही 144 वर्षांनंतर दुर्मिळ ‘त्रिवेणी योग’ घडत असल्यामुळे या दिवशी आध्यात्मिक महत्त्व अधिक होते. परिणामी, प्रचंड गर्दी झाली होती, ज्यामुळे ही चेंगराचेंगरी (Mahakumbh Mela Stampede) झाली. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधला आणि तात्काळ मदत पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. याच वेळी, 1000 हून अधिक वैद्यकीय कर्मचारी मेळ्यात तैनात करण्यात आले होते. त्यात 300 तज्ज्ञ डॉक्टर्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ते सज्ज आहेत.

हे पण वाचा : केंद्र सरकारचे नवे निर्देश!! रेशन कार्डसाठी ई-केवायसी अनिवार्य

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज