Maharashtra EV Bus : लाल परी नटली …! बदलले रुपडे …! ताफ्यात दाखल झाल्या 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra EV Bus : एस. टी. ही महाराष्ट्राचीहक्काची गाडी आहे असे म्हणायला काहीच हरकत. आजही राज्याच्या ग्रामीण भागात पोहोचणारी ही गाडी लाल परी म्हणून ओळखली जाते. या ‘लाल परी’चे रुपडे बदलले असून आता शासनाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेसची (Maharashtra EV Bus) एंट्री झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपट येथील आगारात एसटीच्या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन केले.

या बस पर्यावरण पूरक (Maharashtra EV Bus)

या उदघाटन प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महामंडळाला 5 हजार 150 इलेक्ट्रिक बस आपण देत आहोत. काळ बदलतोय, स्पर्धात्मक जगात पुढे जातोय, अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे. इलेक्ट्रिक बस (Maharashtra EV Bus), सीएनजी/एलएनजी गाड्यांमुळे प्रदूषण होणार नाही. पर्यावरण पूरक वातावरण कायम राहील. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. सध्या बोरिवली – ठाणे – नाशिक मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होत आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्यभरात विविध टप्प्यांत 5,150 इलेक्ट्रिक बसेस एसटीच्या ताफ्यात सामील होतील. ठाणे ते नाशिक आणि बोरिवली ते नाशिक 20 बसेस धावणार आहेत.

गाववाल्यांना सुद्धा करता येणार AC बसचा प्रवास (Maharashtra EV Bus)

मुख्यमंत्री म्हणाले की, शहरांमध्ये राहणारे लोक इलेक्ट्रिक आणि एसी बसमधून (Maharashtra EV Bus) प्रवास करतात, मात्र खेड्यात राहणाऱ्या लोकांना ही सुविधा मिळत नाही. त्यामुळे त्यांनी इलेक्ट्रिक व एसी बसेसच्या सुविधेवर भर दिला असून लवकरच ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना इलेक्ट्रिक व एसी बस सुविधेचा लाभ घेता येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एसटी स्टँडच्या सुशोभीकरणासाठी औद्योगिक विकास मंडळाने 600 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.