Maharashtra S. T. : ‘या’ व्यक्तींना करता येईल सलग 6 महिने एसटीचा मोफत प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra S. T. : राज्यात ट्रेन नंतर एस टी ने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आजही अनेक गाव खेड्यात एस टी च जास्त चालते. आजही आपल्या निश्चित ठिकाणी जाण्यासाठी गावागावात या लाल परीची वाट पाहत असतात. यापूर्वीच राज्य शासनाने मोठे निर्णय घेत महिलांसाठी एस टी च्या तिकिटामध्ये 50 टक्के सूट दिली आहे. शिवाय जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर आता एसटी महामंडळाकडून आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सहा महिने सलग एसटीचा प्रवास मोफत करता येणार आहे. हा प्रवास कोणाला मोफत करता येणार आहे ? त्यासाठी काय अटी आहेत चला जाणून घेऊया…

एसटी महामंडळाने जारी केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार आता (Maharashtra S. T.) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या, ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या तसेच वैद्यकीय कारणांमुळे अपात्र ठरलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वयाच्या 75 वर्षांपर्यंत सलग सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एसटीचा मोफत प्रवास करता येणार आहे.

पास ची सुविधा

यासाठी त्यांना पास मिळणार आहे. याशिवाय, एसटी महामंडळातील (Maharashtra S. T.) सेवेत असताना मृत्यू पावलेल्या, सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा, विधूर यांना वयाच्या ६५ वर्षापर्यंत दरवर्षी सलग सहा महिन्यांसाठी मोफत एसटीचा प्रवास उपलब्ध होणार आहे.

यामुळे या निर्णयाचा आता या संबंधित लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. खरे तर याआधी मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीला वर्षातून केवळ एका महिन्याचा मोफत प्रवासाचा पास दिला जात असे. आता मात्र हा पाच सहा महिन्यांसाठी दिला जाणार आहे.

या काळातच मोफत प्रवास (Maharashtra S. T.)

मात्र या मोफत पासचा वापर करून फक्त सप्टेंबर ते फेब्रुवारी या ऑफ सीझनमध्येच (Maharashtra S. T.) प्रवास करता येणार आहे. सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांच्या कालावधीत सलग या पासचा वापर करून या संबंधित लाभार्थ्यांना मोफत प्रवास करता येईल. या निर्णयाचा हजारो लोकांना फायदा होणार अशी माहिती समोर येत आहे.