Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला भेट द्या महाराष्ट्रातल्या ‘या’ शिवमंदिरांना ; प्रत्येक मंदिर आहे खास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mahashivratri 2024 : यंदाच्या वर्षी ८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. संपूर्ण देशभर महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी उपास केला जातो. शंकराच्या मंदिरात भेटी दिल्या जातात. मनोभावे (Mahashivratri 2024) शंकराचे स्मरण पूजन केले जाते. तुम्ही देखील शंकराचे भक्त असाल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या काही प्रसिद्ध शंकराच्या मंदिराबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..

भीमाशंकर

पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात भीमाशंकर हे मंदिर आहे. भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेलं हे एक मंदिर. हे ठिकाण सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असून अतिशय घनदाट आरण्याने वेढलेले आहे 1984 साली (Mahashivratri 2024) आरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. आणि तिथे हे मंदिर वसलेले आहे. भारतातल्या बारा ज्योतिर्लिंग पैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर जवळपास बाराशे ते चौदाशे वर्षांपूर्वीचे आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी गर्दी होते.

बाबुलनाथ मंदिर (Mahashivratri 2024)

बाबुलनाथ हे मंदिर मुंबईमध्ये स्थित असून प्राचीन मंदिरांप्रमाणे हे शिव मंदिर आहे. मुंबईत हे शिवमंदिर एका छोट्याशा टेकडीवर वसलेला आहे. हे शिवमंदिर मुंबईतल्या सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक मानला जातो. बाबुल वृक्षाच्या देवाच्या रूपातील शिव हे या मंदिरातलं मुख्य वैशिष्ट्य. मंदिरामध्ये तुम्हाला जायचं असेल तर लिफ्ट न जाण्याची सुद्धा सोय इथे उपलब्ध आहे. महाशिवरात्री (Mahashivratri 2024) इथे मोठा उत्सव भरतो आणि लाखो भाविक या ठिकाणी भेट देतात.

कैलास शिव मंदिर एलोरा

महाराष्ट्रातील औरंगाबादजवळील सह्याद्री टेकडीवरील एलोरा लेणी येथे भगवान (Mahashivratri 2024) शिवाला समर्पित असलेले कैलाश किंवा कैलाशनाथ मंदिर हे जगातील सर्वात एकाच मोठ्या दगडात बांधलेले हिंदू मंदिर आहे. भगवान शिवाचे निवासस्थान, म्हणून कैलास मंदिर लोकप्रिय आहे. असे मानले जाते की हे मंदिर 8 व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण I याने 756 ते 773 इसवी सन 756 च्या दरम्यान पल्लव आणि चालुक्य राज्याच्या कलाकारांच्या मदतीने बांधले होते. त्यांच्याकडे विरुपाक्ष मंदिराचे मॉडेल तयार असल्याने, कैलास मंदिरासाठी त्यांनी इतके मोठे मंदिर बांधण्यास कमी वेळ घेतला. त्यांनी कैलास पर्वताप्रमाणेच बहुमजली मंदिर बांधले.