महिलांसाठी सरकारची भन्नाट योजना!! 1000 रुपयांत मिळवा 2 लाख रुपये

0
4
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये प्रमुख म्हणजे महिलांसाठी वेगवेगळ्या बचत योजना उपलब्ध करून देणे . या योजना भारत सरकार महिलांना वित्तीय दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राबवत असतात. त्यातील अशीच एक महत्त्वाची योजना म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजना (Mahila Samman Savings Certificate). या योजनेतून महिलांना कमी गुंतवणुकीतून जास्त नफा मिळतो.

महिलांसाठी फायदेशीर योजना –

या योजनेची सुरुवात सरकारने 1 एप्रिल 2023 रोजी झाली. ही योजना विशेष करून महिलांना आर्थिक सुरक्षा आणि बचतीसाठी उत्तेजन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. महिलांना या योजनेमध्ये आकर्षक व्याज दराने गुंतवणूक करण्याची संधी मिळते. यामध्ये, 7.5% वार्षिक व्याज दिले जाते, जे तिमाही आधारावर खात्यात जमा केले जाते. त्यामुळे महिलांना जास्त नफा मिळवण्याची चांगली संधी मिळते.

कर सवलतीचा लाभ –

महिलांना किमान 1000 रुपये जमा करण्याची आवश्यकता असते, तर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. या योजनेत महिला स्वतःसाठी तसेच त्यांच्या अल्पवयीन मुलींसाठीही गुंतवणूक करू शकतात. तसेच , पती आपल्या पत्नीसाठीही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. योजनेची एक आणखी महत्त्वाची बाब म्हणजे, महिलांना या योजनेत गुंतवणूक करताना कर सवलतीचा लाभ मिळतो. ही योजना भारतातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे महिलांना सहजपणे बचत आणि गुंतवणुकीचे फायदे मिळू शकतात.

महिला सन्मान बचत पत्र योजना –

व्याज दर – 7.5% (तिमाही आधारावर)
गुंतवणुकीची किमान रक्कम – 1000 रु
गुंतवणुकीची जास्तीत जास्त रक्कम – २ लाख रु
वर्षाची मुदत – 2 वर्षे
कर लाभ – आयकर कायदा 80-सी अंतर्गत सवलत
व्याजावर कर – लागू (टीडीएस कापला जातो)