देशातील मोठ्या शहरांमध्ये वायुप्रदूषणामुळे लोकांना श्वास घेणे मुश्किल झाले. म्हणून दिल्ली सारख्या महत्वाच्या शहरात ऑक्सिजन पार्क उभारले जात आहेत. जिथे मोठी रक्कम देऊन ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो आहे.म्हणूनच आजच्या लेखात आम्ही घराच्या घरी लावता येतील अशा काही रोपांची माहिती देणार आहोत ज्यामुळे घरात २४ ऑक्सिजन राहून घरातील हवा सुद्धा शुद्ध राहील. यातील काही झाडे 24/7 ऑक्सिजन उत्पादन करून आणि हवा शुद्धीकरण करतात याबरोबरच तुमच्या घराची शोभा सुद्धा वाढवतात. चला तर मग जाणून घेऊया…
स्नेक प्लांट
वायूप्रदूषणापासून बचाव करण्यासाठी घरात स्नेक प्लांट लावा. ही वनस्पती हवा शुद्ध करते आणि घरात कुठेही लावता येते. ते जिथे ठेवले जाते तिथे हवा शुद्ध करते. हे रोप दिसायला सुद्धा खूप आकर्षक दिसते.
बांबूचे रोप
वायू प्रदूषणापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी घरात बांबूचे रोप लावा. याच्या पानांमध्ये क्लोरोफिल आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे हवेतील हानिकारक वायू आणि कण कमी करतात.
खजूराचे झाड
वायू प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी खजूर लावा. ही वनस्पती हवा शुद्ध करते आणि वातावरणातील विषारी वायू काढून टाकण्यासाठी ओळखली जाते. हे तुम्ही तुमच्या घरातही ठेवू शकता.
कोरफडीचे रोप
वायू प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही कोरफडीचे रोप देखील लावू शकता. तुम्ही ते तुमच्या घरात किंवा बाल्कनीत ठेवू शकता. ही वनस्पती घरातील हवा शुद्ध करते आणि आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.
मनी प्लांट
मनी प्लांटमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि हवा शुद्ध होते. घरात ठेवल्यास घरातील हवा पूर्णपणे स्वच्छ होईल.