Malhargad Fort : ‘हा’ आहे मराठा साम्राज्याच्या शेवटचा किल्ला; गडप्रेमींनी अवश्य भेट द्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Malhargad Fort) आपल्या महाराष्ट्र्राला भव्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी गौरवशाली इतिहासाचे गड किल्ल्यांच्या माध्यमातून जतन करण्यात आले आहे. मराठा सम्राज्याच्या पराक्रमाचे साक्षीदार असणारे अनेक किल्ले महाराष्ट्रात आहेत. मराठ्यांनी वेगवेगळ्या मोहीमा फत्ते करून अनेक गड किल्ल्यांवर विजय मिळवला. तर काही गड किल्ले त्यांनी शत्रूंच्या हालचालींवर लक्ष देण्यासाठी बांधले होते. आज आपण मराठ्यांनी बांधलेल्या शेवटच्या किल्ल्याविषयी जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर मराठा साम्राज्यात पुढे किल्ला बांधला गेला नाही.

मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला (Malhargad Fort)

मराठ्यांचा इतिहास फार मोठा आहे. आपण कायमच त्यांच्याविषयी पुस्तकात, चित्रपटात वाचत पाहत आलो आहोत. मात्र बऱ्याच लोकांना मराठा साम्राज्यातील शेवटच्या किल्ल्याविषयी माहिती नाही. तर, पुणे जिल्ह्याजवळ असलेला ‘मल्हारगड’ हा मराठा साम्राज्यात बांधला गेललेला शेवटचा किल्ला आहे. काही अवशेष आणि तज्ञांच्या माहितीनुसार हा किल्ला १७५७ ते १७६० या काळात बांधला गेल्याचे सांगितले जाते.

(Malhargad Fort) पुण्यापासून सासवडच्या दिशेने जाताना लागणारा दिवेघाट संपला की डावीकडे झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो. तिथून काही अंतर पुढे गेल्यावर डोंगराची लांबच लांब एक रांग दिसते. या डोंगर रांगेत एका खिंडीत हा डोंगरी किल्ला आहे. सासवडपासून हा किल्ला ३० किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

मल्हारगड कुणी बांधला होता?

मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला मल्हारगड हा मराठा सरदार भीमराव पानसे यांनी बांधला होता. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ते पेशव्यांच्या तोफखान्याचे सरदार होते. सुमारे साडेचार ते पाच एकर परिसरात हा किल्ला पसरलेला आहे. त्याचा आकलर त्रिकोणी असल्यामुळे तो अत्यंत आकर्षक दिसून येतो. तसेच मल्हारगडाच्या (Malhargad Fort) आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट बांधण्यात आला आहे. हा किल्ला आकाराने अतिशय लहान असून समुद्रसपाटीपासूनसुमारे ३१६६ फूट उंचीवर बांधण्यात आला आहे.

पश्चिम घाटावर नजर ठेवणारा डोंगरी किल्ला

मल्हारगड हा आकाराने लहान असलेला डोंगरी किल्ला आहे. ज्याची उभारणी करण्यामागे एक विशेष हेतू होता. मराठा सरदार भीमराव पानसे यांनी पश्चिम घाटावर आणि या घाटातून आगेकूच करणाऱ्या शत्रूंच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता.

कसे जाल?

जर तुम्हाला मल्हारगडावर जायचे असेल तर तुम्ही पुण्याहून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करू शकता. यासाठी तुम्हाला पुण्याहून हडपसर मार्गे सासवडकडे जावे लागेल. (Malhargad Fort) या डोंगर भागातील गडावर जाण्यासाठी एकूण २ पायवाटा आहेत. यातील पहिली वाट ही थेट महाद्वाराकडे जाते तर दुसरी वाट या किल्ल्याच्या मागील बाजूस जाते.

काय पहाल?

किल्ल्याचा मुख्य दरवाजा भव्य असून अद्यापही सुस्थित आहे. त्याच्या कामावरून तत्कालीन दुर्गस्थापत्याची कल्पना येते. तट, दरवाजा, नगारखाना, पहाऱ्याच्या देवड्या, माऱ्याच्या जंग्या, तोफांच्या जागा हे सारं इथं पाहण्यासारखं आहे. या किल्ल्यावर २ तलाव, २ बांधीव विहिरी आणि व्यवस्थित तटबंदी आहे. तर आतील बालेकिल्ल्यात एक महादेवाचं आणि एक खंडोबाचं मंदिर आहे. (Malhargad Fort)