Marathi Film : ‘सोसलेल्या जाणिवेतून..’; स्वरमयी बायोपिक ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Marathi Film) मराठी सिनेविश्वाचा आज जगभरात डंका आहे. यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी मेहनत घेतली आहे. ज्यात न केवळ अभिनेता, अभिनेत्री तर दिग्दर्शक, निर्माते, संयोजक आणि संगीत कलाक्षेत्रातील मंडळींचादेखील समावेश आहे. यामध्ये बाबूजींच्या नावाचा देखील समावेश आहे. त्यांनी आपल्या अवीट सुरांनी साऱ्यांना वेड लावले. त्यांच्या ‘गीतरामायणा’ने तर प्रत्येक संगीत प्रेमीच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. आजही स्वर छेडले असता बाबूजींच्या प्रभावी कारकिर्दीचा उल्लेख होतो.

अशा या बाबुजींच्या आयुष्यावर आधारलेला त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगावर भाष्य करणारा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर आपल्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचा दुसरा टिझर प्रदर्शित झाला आहे. (Marathi Film) या चित्रपटातून प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी गायकाच्या जीवनाचा प्रवास घडणार आहे. टीझरमध्ये ‘माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासात पदोपदी सोसलेल्या जाणिवेतून, ही आर्तता माझ्या स्वरात उतरते’, असे एक वाक्य आहे. या वाक्यातूनच ‘बाबुजीं’च्या व्यक्तिमत्वाची ओळख होते.

Swargandharva Sudhir Phadke | Official Teaser | Sunil Barve | Adish Vaidya | 1st May 2024

रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित, योगेश देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात सुनील बर्वे, आदिश वैद्य, शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, मृण्मयी देशपांडे, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Marathi Film) या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद योगेश देशपांडे यांचे असून सौरभ गाडगीळ, योगेश देशपांडे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून आजवरचा हा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक ठरेल.

परंतु, त्यामागचा संघर्ष खूप कठीण.. (Marathi Film)

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ‘एखाद्या नावाजलेल्या व्यक्तिमत्वाचा जीवनपट पडद्यावर दाखवणे नक्कीच सोपे नसते. त्यासाठी सखोल अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. ‘बाबुजी’ हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. मला त्यांचा जीवनपट पडद्यावर दाखवायचा होता. यासाठी मी जमेल तितकी त्यांच्याविषयी माहिती मिळवली’.

‘त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना मी भेटलो. त्यांच्याविषयी काही अशा गोष्टी कळल्या, ज्या अनेकांना माहित नाही. त्यांचे तेच आयुष्य मी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची गायली आपल्या सगळ्यांना माहित आहे, परंतु त्यामागचा संघर्ष खूप कठीण होता. त्यांचा हा प्रवास ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’मध्ये पाहायला मिळणार आहे’. (Marathi Film)