Mental Illness : गर्दीत असूनही एकटं वाटतं? असू शकते गंभीर मानसिक समस्या; वेळीच लक्ष द्या अन्यथा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mental Illness) अनेक लोकांना चार चौघात बोलायची, स्वतःचं मत मांडायची इतकंच काय तर एखाद्याशी संवाद वाढवण्याची देखील भीती वाटते. असे लोक एकलकोंडे आणि स्वतःतच रमणारे असतात. अत्यंत अबोल आणि घाबरट असा या लोकांचा स्वभाव असतो. पण मुळात हा स्वभाव आहे का? तर नाही. ही एक अशी स्थिती आहे जी माणसाला स्वतःतच गुरफटून टाकते. यामुळे माणूस स्वतःशीच एक झुंज देत असतो. अशा परिस्थितीत माणूस सर्वांपेक्षा अलिप्त झालेला असतो.

अनेक लोकांना अशाप्रकारची भीती वाटते. ही भीती मानसिक आरोग्य समस्या असल्याचे दर्शवते. या स्थितीतील माणसं कायम चिंतेत असतात. आपण असे केले तर तसे होईल. आपल्यामुळेच हे सगळं होत आहे. (Mental Illness) सर्व नकारात्मक घडणाऱ्या गोष्टींचा ते आपल्याला दोष देतात. असे जर तुमच्याही बाबतीत घडत असेल किंवा तुमच्या आसपासच्या कोणाही सोबत असे घडत असेल तर त्याचे कारण जाणून घ्या आणि वेळीच या समस्येचे समाधान शोधा. कारण या सगळ्याचा परिणाम तुमच्या नात्यावर पडू शकतो. चला तर जाणून घेऊया मानसिक आरोग्यात बिघाड होण्याची कारणे आणि लक्षणे.

मानसिक आरोग्यात बिघाड होण्याची कारणे (Mental Illness)

आपल्या लहानपणी एखादी घटना, प्रसंग आपण डोळ्यांनी पाहिलेला असतो. जो आपल्या मनावर आणि मेंदूवर आघात करतो. लहानपणी डोळ्यांनी पाहिलेली दृश्य ही डोक्यात फिट झालेली असतात. यातील जे प्रसंग भयावह किंवा मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारे असतात त्यांचा आपल्या वयासोबत प्रभाव वाढत जातो.

याशिवाय माणसात अनेक स्वप्न पूर्ण करण्याची भूक असते. जी पूर्ण होत नसतील किंवा योग्य मार्ग सापडत नसेल तरीही या उणिवा मानसिक आरोग्यावर परिणाम करत असतात. याशिवाय एखाद्या ठिकाणी चार चौघात झालेला अपमान देखील मानसिक आरोग्य अस्थिर करण्यासाठी कारणीभूत ठरतात.

मानसिक आरोग्यातील बिघाडाची लक्षणे

  • एकटेपणा, अबोल आणि तंद्री लागणे.
  • चारचौघात असूनही एकटं वाटणे. (Mental Illness)
  • लोकांशी बोलणे टाळणे, नजर चुकवणे.
  • प्रत्येक वाईट घटनेचा स्वतःशी संबंध लावणे. स्वतःला दोष देणे.
  • नातेसंबंधांविषयी निष्काळजी वागणे.
  • नकार पचविण्याची तयारी नसणे.
  • सतत परफेक्ट होण्यासाठी प्रयत्न करणे. इतरांशी स्पर्धा करत बसणे.

जर यातील कोणतीही लक्षणे तुमच्यामध्ये किंवा तुमच्या आसपास असणाऱ्या व्यक्तीत दिसत असतील तर या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. असे केल्यास गंभीर मानसिक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. भविष्यात अत्यंत त्रासाला सामोरे जावे लागेल. (Mental Illness)