Metro Coach Restaurant : मेट्रोत सुरु होणार कोच रेस्टॉरंट; प्रवासात घेता येणार उत्तम भोजनाचा आस्वाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Metro Coach Restaurant) जेव्हापासून मेट्रो सिटीमध्ये मेट्रो धावू लागली आहे तेव्हापासून प्रवाशांचे जीवन किंचित सुखकर झाले आहे. लोकल, बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा ताण कुठेतरी थोडा कमी झाला आहे. अनेक लोक आज प्रवासासाठी मेट्रोचा वापर करत आहेत. गेल्या काही काळात बस, लोकलनंतर प्रवासासाठी मेट्रोला विशेष पसंती दिली जात असल्याचे दिसून आले आहे. अत्यंत कमी वेळात एखाद्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी अनेक प्रवासी मेट्रोचा वापर करताना दिसत आहेत. जर तुम्हीच मेट्रोने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि तितकीच आनंदाची आहे.

NMRC ची नवी कल्पना

तुमच्यापैकी अनेक जण मेट्रोने प्रवास करत असतील. त्यामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच मेट्रो कॉर्पोरेशनतर्फे प्रवाशांसाठी अत्यंत चांगल्या आणि नव्या सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. (Metro Coach Restaurant) यातच आता प्रवाशांना मेट्रोत रेस्टॉरंटमध्ये जेवण्याची आणि आपल्या मित्र- मैत्रिणी तसेच कुटुंबासोबत भोजनाचा आस्वाद घेण्याची मजा लुटता येणार आहे. नुकतीच NMRC (नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशन) एक नवी कल्पना आणली आहे. जिच्या माध्यमातून हे शक्य होत आहे.

मेट्रो कोच रेस्टॉरंट सुरू करण्याची घोषणा (Metro Coach Restaurant)

नुकतीच नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे मेट्रो कोच रेस्टॉरंट सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता मेट्रोचे प्रवासी मेट्रोत उत्तम खाण्या पिण्याचा आस्वाद घेऊ शकतात. इतकेच नव्हे तर, खाण्या-पिण्याव्यतिरिक्त मेट्रोमध्ये प्रवास करताना तुम्ही आपल्या मित्र परिवारासोबत तसेच कुटुंबियांसोबत छोटी मोठी पार्टी आणि मीटिंग्सचेदेखील आयोजन करू शकता. इतकेच काय तर, या योजनेंतर्गत १०० हून अधिक लोकांच्या बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

मेट्रो कोच रेस्टॉरंट कधीपासून सुरु होणार?

नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे केल्या गेलेल्या घोषणेनंतर मेट्रो कोचच्या आत एक रेस्टॉरंट तयार करण्यात आले आहे. ज्याची वेगवेगळ्या पद्धतीने चाचणी केली जात आहे. लवकरच या रेस्टॉरंटचे उद्घाटन केले जाईल आणि हा कोच प्रवाशांच्या वापरासाठी सुरू करण्यात येईल. (Metro Coach Restaurant)

माहितीनुसार, हे रेस्टॉरंट नोएडा सेक्टर १३७ मध्ये मेट्रो रेल्वे कोचअंतर्गत तयार करण्यात आले आहे. ज्यात आत आणि बाहेर अशा प्रशस्त आणि चांगल्या दर्जाच्या असं व्यवस्था आहेत. हे रेस्टॉरंट येत्या २० एप्रिल २०२४ पासून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. (Metro Coach Restaurant) रेस्टॉरंट खुले असण्याची वेळ सकाळी ११.३० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अशी असणार आहे.