हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Metro Train Accident) आपण रोज रेल्वे अपघाताच्या बातम्या ऐकत, वाचत असतो. यातील बऱ्याच अपघातांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. कित्येक लोक स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावतात. तर, काही लोक वाढत्या गर्दीमुळे अपघातांना बळी जातात. बऱ्याचवेळा धावत्या लोकलमध्ये चढायच्या नादात बरेच लोक पडतात, ट्रेनखाली जातात. अशा अनेक घटना वारंवार समोर येत असतात. तरीही घडायच्या त्या घटना रोज घडतचं आहेत. दरम्यान, अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील.
ट्रेनखाली अडकला तरुणाचा पाय (Metro Train Accident)
आतापर्यंत तुम्ही मुंबई लोकलच्या अपघाताचे बरेच व्हिडीओ पाहिले असतील. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरशः काटा उभा राहील. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, ऑस्ट्रेलियात मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये पाय अडकतो. तो व्यक्ती सगळे प्रयत्न करून आपला पाय काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याला काही यश येत नाही. यानंतर प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले इतर प्रवासी त्याच्याभोवती जमा होताना दिसतात. यावेळी जर ट्रेन सुरु झाली असती तर काय झाले असते याचा नुसता विचार करून अंगावर काटा येतोय.
एकीचे बळ
ज्या व्यक्तीचा ट्रेनखाली पाय अडकला आहे तो आपला पाय बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. (Metro Train Accident) पण, काही केल्या त्याला यश येत नाही. अशावेळी प्लॅटफॉर्मवर उपस्थित इतर प्रवासी त्याच्या मदतीला धावून येतात आणि चक्क मेट्रो ट्रेन आपल्या हातांनी ढकलू लागतात. खूप प्रयत्न करूनही जेव्हा त्या व्यक्तीचा पाय काढण्यात मेट्रो कर्मचाऱ्य़ांना यश आले नाही. तेव्हा सहप्रवाशांच्या एकीने चक्क मेट्रो ट्रेन हलवली आणि त्या व्यक्तीचा पाय सुखरूप बाहेर काढला.
ही घटना प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होऊ शकला आहे. हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर sachkadwahai नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो पाहून अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Metro Train Accident) या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की. ‘याला म्हणतात एकीचे बळ’, तर आणखी एकाने लिहिलंय, ‘संघटनेत ताकद असतेच’. अन्य एका युजरने लिहिले, ‘जर हे भारतात घडले असते तर लोकांनी त्यांचे फोन काढून व्हिडिओ बनवत राहिले असते’.