MHADA Lottery 2024 : म्हाडाच्या कोकण विभागाची 5,311 सदनिकांसाठी आज सोडत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MHADA Lottery 2024 : मध्यमवर्गीयांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाचे महत्वाचे योगदान आहे. पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये हक्काचे घर घेणे मोठे जोखमीचे होऊन बसले आहे. राज्यातील इतर विभागात देखील म्हाडा कडून घरे दिली जातात. म्हाडाच्या (MHADA Lottery 2024) कोकण मंडळाने नुकतीच जाहिरात काढली होती. यात जवळपास ५,३११ घरांचा समावेश करण्यात आला होता. तर त्यासाठी कोकण विभागात २५ हजार ७८ पात्र नागरिकांचे अर्ज आले होते. या पात्र अर्जदारांकरिता संगणकीय सोडत आज (२४ ) काढली गेली. अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसेच म्हाडाच्या अधिकृत फेसबुक पेज, संकेतस्थळावरून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहता येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

कोणत्या योजनेंतर्गत किती घरे? (MHADA Lottery 2024)

लॉटरीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १,०१० सदनिकांचा समावेश आहे. एकात्मिक गृहनिर्माण (MHADA Lottery 2024) योजनेंतर्गत १,०३७ सदनिका, सर्वसमावेशक योजनेंतर्गत ९१९ सदनिका, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ सदनिका आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेंतर्गत २,२७८ सदनिका आहेत. इतरही योजनांतर्गत सुमारे ३,०३३ सदनिकांच्या वितरणासाठी सोडत काढली जाणार आहे.

विजेत्यांची यादी सहानंतर

सोडतीतील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या (MHADA Lottery 2024) https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी सहानंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच विजेत्या अर्जदारांना ‘एसएमएस’द्वारेही विजेता ठरल्याबाबतच संदेश त्यांनी अर्जासोबत नोंद केलेल्या मोबाईलवर तत्काळ प्राप्त होणार आहे.