हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महागाई एवढी वाढली आहे कि , स्वतःचे घर बांधणे किंवा विकत घेणे कठीण झाले आहे. पण मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांप्रमाणेच आता नाशिकमध्येही परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होण्याची सुवर्णसंधी नागरिकांना चालून आली आहे. म्हाडाच्या (MHADA Lottery 2025) नाशिक मंडळाला 20% योजनेतून मिळालेल्या 555 घरांचे वितरण प्रक्रिया लवकरच जाहीर होणार आहे. तर चला जाणून घेऊयात याबदल अधिक माहिती .
म्हाडाच्या नाशिक मंडळाला 555 घरे –
म्हाडाच्या 20% योजनेअंतर्गत खाजगी विकासकांच्या गृह प्रकल्पातील काही घरे आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात येतात. पण नाशिकमधील अनेक विकासकांनी ही घरे देण्यास टाळाटाळ केली होती. परिणामी म्हाडाने या विकासकांना नोटिसा बजावत कठोर भूमिका घेतली. या पाठपुराव्यानंतर अखेर म्हाडाच्या नाशिक मंडळाला (MHADA Lottery 2025 ) नाशिककरांसाठी सुवर्णसंधी ! म्हाडाच्या स्वस्त घरांची जाहिरात आठवडाभरात येणार 555 घरे मिळाली असून त्यासाठी लवकरच सोडतीची ( वितरणाची ) प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आठवड्याभरात या घरांच्या जाहिरात प्रसिद्ध –
नाशिक मंडळाला (Nashik Housing and Area Development Board (NHADB) आतापर्यंत 1485 घरे मिळाली होती, त्यापैकी 1328 घरांची सोडत काढण्यात आली आहे. आता मिळालेल्या 555 घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू झाली आहे. आठवड्याभरात या घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. मुंबई वगळता राज्यातील 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिका क्षेत्रातील 4,000 चौरस मीटरपेक्षा जास्त बांधकाम असलेल्या प्रकल्पांमध्ये ही घरे राखीव ठेवली जातात.
नाशिककरांना मोठी संधी ( MHADA Lottery 2025 ) –
म्हाडाच्या या घरांसाठी अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिक अर्ज करू शकणार आहेत. घरांच्या किंमती या खाजगी बाजारभावाच्या तुलनेत कमी असतील, त्यामुळे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी नाशिककरांना मिळणार आहे. त्यामुळे नाशिकमधील इच्छुक नागरिकांनी म्हाडाच्या वेबसाइटवर लक्ष ठेवावे, कारण या आठवड्यातच सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होईल आणि अर्ज प्रक्रिया सुरू होईल.