MHADA Lottery : म्हाडाच्या लॉटरीमध्ये तुमचे नाव नाही ? चिंता सोडा, म्हाडाची आणखी एक सोडत जाहीर होणार

mhada new lottery

MHADA Lottery : पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये आपले स्वतःचं हक्काचं घर घेण्यासाठी सर्वसामान्य माणसाला बळ देणारी संस्था म्हणजे म्हाडा. यंदाच्या वर्षी म्हाडा कडून 2030 घरांसाठी लॉटरी निघालेली आहे. याची प्रक्रिया आता सुरू आहे मात्र जर तुमचं यंदाच्या वर्षी यादीत नाव आलं नाही तर चिंता करू नका कारण पुढच्या वर्षी म्हाडाच्यावतीने (MHADA Lottery) पुन्हा एकदा सोडत जाहीर करण्यात येणार आहे.

अवघ्या सात महिन्यात म्हाडाची आणखी एक सोडत जाहीर केली जाणार असून 2025 मध्ये साधारण एप्रिल ते मे महिन्यामध्ये म्हाडाच्या वतीने आणखी एक सोडत जारी करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाच्या उपाध्यक्षांनी सोडत जाहीर करत असताना कळवली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींची नावे यंदाच्या लिस्टमध्ये आलेली नाहीत त्यांना आता अवघ्या सात महिन्यात नव्याने फॉर्म भरून पुन्हा एकदा म्हाडाच्या लॉटरीमध्ये आपला दावा दाखल करता येणार आहे.

यंदाच्या सोडती बद्दल सांगायचं झाल्यास साधारण 2030 घरांसाठी ही सोडत ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये राबवण्यात आली होती. लकी ड्रॉ लॉटरीसाठी म्हाडाकडे एक लाख 34 हजार 350 अर्ज आले. त्यापैकी पडताळणी करून कागदपत्र पूर्ण असलेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात आले आहे. पण सध्याच्या लॉटरीत जरी तुमचे नाव आले नसले तरी पुढच्या वर्षी अवघ्या ७ महिन्यात निघणाऱ्या लॉटरीत तुम्ही पुन्हा अर्ज करू शकता.