MHADA Lottery : पुणे म्हाडाकडून गुढीपाडव्याची भेट…! वाढवली घरं आणि अर्जाची मुदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MHADA Lottery : सध्याच्या महागाईच्या जमान्यात पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये स्वतःचं घर घेण हे मध्यमवर्गीयांसाठी एका स्वप्नासारखचं आहे. मात्र याच स्वप्नांना खरं रूप देण्यासाठी म्हाडा मदत करते. परवडणाऱ्या दरामध्ये म्हाडा करून घरे उपलब्ध करून दिली जातात. मंडळी आज गुढीपाडवा, गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभ गोष्टी आजच्या दिवशी केल्या जातात मात्र सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचा स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाने (MHADA Lottery) आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी एक आनंदाची बातमी दिली आहे.

खरंतर पुणे म्हाडाकडून ही आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या (MHADA Lottery) पुणे मंडळांने एक सोडत काढली होती. आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर याच सोडतीच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 8 मार्च रोजी पुणे विभागासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली होती आणि याची मुदत ही 8 एप्रिल पर्यंत होती. मात्र नागरिकांच्या माध्यमातून अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदत वाढ दिली पाहिजे ही मागणी करण्यात आली होती. हीच मागणी लक्षात घेऊन म्हाडा कडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला म्हाडा कडून मुदतवाढ देण्यात आली आहे. एवढंच नाही तर या लॉटरीमध्ये समाविष्ट केलेला घरांची (MHADA Lottery) संख्या देखील वाढवण्यात आली आहे.

घरांच्या संख्येत वाढ (MHADA Lottery)

पुणे पिंपरी चिंचवड मधील घरांची संख्या 100 ने वाढवली आहे. तसेच या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी 30 मे पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या लॉटरीमध्ये एकूण 4877 घरांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रथम येणारच प्रथम (MHADA Lottery) प्राधान्य या योजनेत 2416 सदनिका, म्हाडाच्या विविध योजनेतील 18 सदनिका, म्हाडा पीएम आवास योजनेत 59, पंतप्रधान आवास खाजगी भागीदारी योजना 978 सदनिका 20% योजना पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड इथं १४०६ सदनिकांचा समावेश आहे

त्यामुळे पुणे विभागासाठी हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला आता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी मुदत (MHADA Lottery) मिळाली आहे. 100 घरं वाढवण्यात आली असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.