MHADA Lottery : म्हाडाच्या ‘या’ मंडळासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू; 941 सदनिका,361 भूखंडांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MHADA Lottery : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा कडून सर्वसामान्य नागरिकांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातात. यंदाच्या वर्षी कोणत्या मंडळासाठी किती घरे ? सोडत कधी या सर्वांची उत्सुकता लागलेली आहे. असे असताना आजच म्हाडा कडून राज्यातल्या एका महत्वाच्या विभागासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी (MHADA Lottery)आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा विभाग कोणता आहे ? किती घरे उपलब्ध आहेत जाणून घेऊया…

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) (MHADA Lottery) छत्रपती संभाजीनगर विभागात बुधवारी ९४१ सदनिका आणि ३६१ भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली.

“गो लाइव्ह” कार्यक्रमाचा शुभारंभ

छत्रपती संभाजीनगर शहर आणि लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, आणि धाराशिव या जिल्ह्यांतील विविध गृहनिर्माण (MHADA Lottery)योजनांतर्गत या मालमत्तांच्या विक्रीसाठी ऑनलाइन संगणकीकृत सोडतीसाठी “गो लाइव्ह” कार्यक्रमाचा शुभारंभ त्याच दिवशी करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर मंडळातील सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी प्रक्रिया आता नवीन एकात्मिक गृहनिर्माण लॉटरी व्यवस्थापन प्रणाली (IHLMS) 2.0 संगणकीकृत प्रणालीद्वारे पार पाडली जात आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणेच, लॉटरीची सोडत पूर्ण झाल्यावर, पहिले अधिसूचना पत्र, स्वीकृती पत्र आणि तात्पुरते नकार पत्र विजेत्या अर्जदारांना त्वरित पाठवले जातील.

घरबसल्या घेता येणार सहभाग (MHADA Lottery)

या नवीन संगणकीकृत प्रणाली आणि ॲपच्या मदतीने फ्लॅटसाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली. या IHLMS 2.0 प्रणालीद्वारे अर्जदार घरून किंवा कुठेही लॉटरी प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. या प्रणालीद्वारे नोंदणी, अर्ज भरणे, दस्तऐवज अपलोड करणे आणि ऑनलाइन पेमेंट यांसारख्या सुविधा सहज उपलब्ध आहेत.