Mhada Lottery : सध्याच्या घरांच्या वाढत्या किमती पाहता घर घेणे सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी गोष्ट आहे. त्यातही घरे जर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी घ्यायची असतील तर मोठी रक्कम हाती असावी लागते. मात्र हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा सारख्या संस्थांचे मोठे योगदान आहे. म्हाडा कडून मुंबई पुण्यासह राज्यातील विविध मंडळांसाठी लॉटरी काढण्यात येते. मुंबई म्हाडाची (Mhada Lottery) सोडत लवकरच निघण्याची शक्यता आहे. याच बरोबर कोकण मंडळाची सुद्धा लवकरच लॉटरी निघण्याची शक्यता आहे.
कोकण मंडळात 3 हजार घरांसाठी लॉटरी (Mhada Lottery)
आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी ही लॉटरी काढली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याचा विचार करता कोकण मंडळाकडे 2 हजार घरे आहेत. मात्र आणखी घरांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळं 3 हजार घरांसाठी लॉटरी (Mhada Lottery) जाहिर होऊ शकते. यात 900 घरे पंतप्रधान आवास योजनेतील असून इतर घरे म्हाडा योजनेतील आहेत. तसंच, यापूर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये विक्री न झालेल्या 4 हजारांहून अधिक घरांचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.
मुंबई मंडळाचीही लॉटरी (Mhada Lottery)
मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मुंबईमधल्या मोक्याच्या जागांवर म्हाडा घरं उपलब्ध करून देत आल्यामुळे म्हाडामधून मुंबईमध्ये घरं घेणाऱ्यांची संख्या मोठी असते. मुंबईकरांसाठी एक खुशखबर असून म्हाडा (Mhada Lottery) प्राधिकरण लवकरच दोन हजार घरांची लॉटरी (Mhada Mumbai) काढणार ऑगस्ट मध्ये आठवड्यात म्हाडा तर्फे गोरेगाव, विक्रोळी, पवई, ताडदेव, जुहू येथील दोन हजार घरांसाठी जाहिरात काढली जाणार आहे. या घरांच्या किंमती 34 लाखांपासून सुरू होणार आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तसंच, अनामत रक्कम जमा करण्याची प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात येणार आहे. म्हाडा लॉटरीसाठी पूर्णपणे संगणीकृत पद्धतीचा वापर केला जाणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.