Mhada Lottery : म्हाडाची डोकेदुखी वाढली …! जवळपास 3000 कोटींची 11000 घरं प्रतीक्षेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mhada Lottery : मध्यम वर्गीयांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करणारी संस्था म्हणून म्हाडाकडे पहिले जाते. मागच्या अनेक वर्षांपासून कित्याक जणांची हक्काच्या घराची स्वप्नं म्हाडाने पूर्ण केली आहेत. म्हाडाची जाहिरात आल्यानंतर ते अगदी सोडतीपर्यंत घरं घेणाऱ्यांचा (Mhada Lottery) उत्साह ओसंडून वाहतो. मात्र मात्र राज्यातल्या अनेक विभागांमध्ये म्हाडाचंची घरे अद्यापही ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. आता कोकण विभागाचे उदाहरण घ्यायचे झाले तर विरार- बोळींज येथे हजारो घरे अद्यापही ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळेच म्हाडाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

5194 घरांची विक्री रखडली (Mhada Lottery)

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार – बोळींज (Mhada Lottery) येथील सुमारे दहा हजार गृह प्रकल्पातील तब्बल 5194 घरांची विक्री अद्याप झालेली नाही. त्यामुळे एक दोन नव्हे तर तब्बल दीड हजार कोटींच्या या घरांची विक्री करण्याचे आव्हान म्हाडा पुढे आहे. त्यामुळे आता तयार घरांची विक्री करण्यासाठी म्हाडा एक गठ्ठा घरांच्या विक्रीचा पर्याय अवलंबताना दिसत असून त्यासाठीच्या निविदा देखील जारी करण्यात आल्या आहेत. निवेदनुसार एकावेळी शंभर घर खरेदी करणाऱ्यांना घरांच्या विक्री दरात 15 टक्क्यांनी सवलत दिली जाणार आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळांना विरार – बोळींज मध्ये दहा हजार घरांचा प्रकल्प उभारला या प्रकल्पातील (Mhada Lottery) काही घर विकली गेली मात्र अद्यापही 5194 घरांची विक्री झालेली नाही. प्रथम येणारच प्रथम प्राधान्य आणि सातत्याने सोडत काढून देखील घरांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे घरांची विक्री झालीच नाही. शिवाय म्हाडाला या घरांच्या देखभालीचा खर्चही उचलावा लागतोय. त्यामुळे भूखंड व्याप्ती सोबतच कोकण मंडळाचा साधारण पंधराशे रुपयांचा महसूल ही थकला आहे. त्यामुळे या घरांची शक्य तितक्या लवकर विक्री करण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील आहे.

जवळपास 3000 कोटींची 11000 घरं प्रतीक्षेत (Mhada Lottery)

आता हे झालं म्हाडाच्या कोकण मंडळाबाबतचा मात्र संपूर्ण राज्य मध्ये जर विचार केला तर जवळपास (Mhada Lottery) 3000 कोटींची 11000 घरं ही अद्यापही खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे इतर विभागीय मंडळांमध्ये असंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. या घरांच्या विक्रीसाठी म्हाडा प्राधिकरणानं एक नवीन स्ट्रॅटेजी तयार केली असून म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर आता कोकण मंडळांना या तरतुदींची अंमलबजावणी करत घरांची विक्री सुरू केली आहे.