MHADA Mumbai : म्हाडा देणार मुंबईत आलिशान घरं ; स्विमिंग पूल, जिम, क्लब हाऊस, पोडियमच्या सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MHADA Mumbai : सर्वसामान्यांना हक्काची घरं मिळवून देणारं नाव म्हणजे ‘म्हाडा’ म्हणून प्रसिद्ध आहे. आतापर्यंत म्हाडा कडून दिल्या जाणाऱ्या घरांमध्ये मोकळी मैदाने, बगीचा अशा गोष्टी मिळायच्या मात्र लवकरच म्हाडा कडून दिल्या जाणाऱ्या घरांमध्ये आलिशान घरांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा असणार आहेत. पहिल्यांदाच म्हाडाच्या मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी स्विमिंग पूल, जिम, क्लब हाऊस, पोडियम अशा उच्च दर्जाच्या सोयी सुविधा असणारी घरं तयार करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार येत्या दिवाळीमध्ये मुंबईतल्या जवळपास 700 घरांसाठी म्हाडा (MHADA Mumbai) तर्फे सोडत काढण्यात येणार आहे. म्हाडाचा पहिला हाय प्रोफाईल प्रोजेक्ट असलेल्या गोरेगावच्या प्रेम नगर इथं 332 घरांचा देखील या सोडती मध्ये समावेश करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न असणार आहे.

हा प्रोजेक्ट गोरेगाव पश्चिमेला स्टेशन पासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असेल. म्हाडाच्या घरांसाठी मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती अर्ज करू शकणार आहेत. गोरेगावच्या प्रेम नगर इथं 39 मजली टॉवर उभारण्याचं काम सध्या वेगाने सुरू असून 29 मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. मार्चच्या सुरुवातीला 2025 पर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा म्हाडाचे (MHADA Mumbai) टार्गेट होते. टॉवरच्या कामाने पकडलेला वेग पाहत दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

39 मजली टॉवरमध्ये असलेल्या चार मजले पोडियम पार्किंग असणार आहे. यात मध्यम उत्पन्न गटासाठी 227 तर उच्च उत्पन्न गटासाठी 108 उपलब्ध असतील परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणाऱ्या म्हाडा (MHADA Mumbai) या आलिशान घरांसाठी किती किंमत आकारणार याबाबत मात्र सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळचे (MHADA Mumbai) मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी एक माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार दिवाळी दरम्यान मुंबईतील सुमारे 700 घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू असून गोरेगावच्या प्रेम नगर येथे उच्च दर्जाच्या सुविधा असलेल्या उच्च आणि मध्यम उत्पन्न गटासाठी बांधलेल्या 332 घरांचा देखील या सोडती मध्ये समावेश करण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती बोरीकर यांनी दिली आहे.