MHADA PUNE : पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) पुणे मंडळाने एक मोठा निर्णय घेतला असून, आता ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वावर शिल्लक घरे वितरित केली जाणार आहेत. त्यामुळे पात्र अर्जदारांना घर मिळण्याची हमी असून, ही संधी एकप्रकारे घराच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.
MHADA चा महत्वाचा निर्णय – घरे मिळणार नक्की!
मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांमध्ये (MHADA PUNE) घर घेणे सामान्य नागरिकांसाठी दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. वाढत्या घरांच्या किमती आणि मर्यादित पर्याय यामुळे अनेकांचे ‘स्वतःचे घर’ या स्वप्नावर मर्यादा येत होत्या. मात्र, पुणे MHADA मंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे ही अडचण काहीशी सुटणार आहे.
यापुढे पुण्यातील MHADA च्या काही शिल्लक घरांचे वाटप ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर होणार आहे. त्यामुळे जे नागरिक लवकर अर्ज करतील, त्यांना घरे हमखास मिळणार आहेत.
कोण करू शकतो अर्ज?
ही संधी मुख्यतः सामान्य प्रवर्गातील पात्र आणि गरजू नागरिकांसाठी आहे. त्यामुळे ज्यांना अद्याप MHADAचे घर मिळालेले नाही, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून ती पारदर्शक असेल, असे MHADAच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
योजनेत अंतर्भूत असलेली घरे: (MHADA PUNE)
- 15% सामाजिक गृहनिर्माण योजना
- 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना
या योजनांतर्गत बचतीत असलेली घरे आता ऑनलाईन पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.
अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरु?
MHADA पुणे मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
लवकर अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्वामुळे लवकर अर्ज करणाऱ्यांना आधी घरे मिळतील.
नोंदणी कशी करावी? (MHADA PUNE)
- इच्छुक नागरिकांनी https://bookmyhome.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी.
- MHADA च्या संकेतस्थळावर वेळोवेळी घरे अपडेट केली जातील, त्यामुळे नियमितपणे वेबसाइट पाहणे आवश्यक आहे.
जर तुम्ही पुण्यात घराच्या शोधात असाल, तर ही MHADAची योजना तुमच्यासाठी एक मोठा चान्स आहे. पात्रता असलेल्यांनी त्वरा करून अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नातील घराच्या दिशेने एक पाऊल टाका!




