MHADA : बेरोजगार अभियंत्यांना मिळणार ‘म्हाडा’ कडून काम ; राज्य गृहनिर्माण खात्याचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MHADA : हातात अभियांत्रिकीची डिग्री आहे पण अद्याप हातात काम नाही असे अनेक तरुण आहेत. मात्र आता अभियंत्यांना नोकरी मिळण्याची चिन्हे आहेत. राज्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना म्हाडा (MHADA) कडून कामे दिली जाणार आहेत. हा महत्वपूर्ण निर्णय राज्य गृहनिर्माण खात्याने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना आता म्हाडाचे (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण) 15 लाख रुपये खर्चाच्या मर्यादेपर्यंतची कामे सोडत म्हणजेच लॉटरी पद्धतीने थेट मिळू शकणार आहेत.

आतापर्यंत जिल्हा परिषदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना दहा लाख रुपयांच्या खर्चाच्या मर्यादा पर्यंतची कामे सोडत पद्धतीने दिली जात होती मात्र म्हाडाच्या (MHADA) कामांचा याला अपवाद होता. यामुळेच म्हाडाची (MHADA) कामे मिळावित या मागणीसाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होती. सरकारच्या या निर्णयामुळे बेरोजगार अभियंतांची गेली अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण झालेली आहे. संघटनेच्या मागणीला यश आल्याची प्रतिक्रिया बेरोजगार अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी दिली आहे.

विशेष समितीची स्थापना (MHADA)

म्हाडा मधील एकूण कामांपैकी 33% काम हे सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना सोडत पद्धतीने वाटप करण्यात यावी यासाठी म्हाडातील (MHADA) उपमुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली काम वाटप समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीमार्फत सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना 15 लाख रुपयांपर्यंतची कामे वाटप केली जाणार आहेत.