Mhada Lottery : खुशखबर ! म्हाडा राज्यभरात बांधणार 19,497 घरे, ‘या’ जिल्ह्यांचा असेल समावेश

mhada
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mhada Lottery : सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) पुढील एका वर्षात मुंबईत ५,१९९ घरे बांधणार आहे. नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने ५,७४९.४९ कोटी (Mhada Lottery) रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा रोड आणि विरार येथे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी कोकण (Mhada Lottery) मंडळाने २०२५-२६ या कालावधीत ९,९०२ घरे बांधण्याची योजना आखली आहे. या घरांच्या निर्मितीसाठी कोकण मंडळ १४०.८५ कोटी रुपये खर्च करणार आहे.

म्हाडाच्या नव्या योजनांमध्ये मोठा विस्तार (Mhada Lottery)

मुंबईतील वाढत्या घरांच्या मागणीचा विचार करून म्हाडाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नवीन बजेटच्या माध्यमातून राज्यभरात १९,४९७ घरे बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबई आणि कोकण मंडळांसोबतच नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथेही घरे बांधण्याचा समावेश आहे.

बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी मोठी तरतूद

मुंबई मंडळातील विविध प्रकल्पांना निधी मंजूर करण्यात आला असून, सर्वाधिक तरतूद (Mhada Lottery) मुंबईतील १०० वर्ष जुन्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल २,८०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मंजूर झालेला निधी

  • बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प – २,८०० कोटी
  • जोगेश्वरी पूर्व पीएमजीपी कॉलनी प्रकल्प – ३५० कोटी
  • बांद्रा पश्चिम परिध खाडी पुनर्विकास प्रकल्प – २०५ कोटी
  • गोरेगाव सिद्धार्थ नगर घर प्रकल्प – ५७३ कोटी
  • परेल जिजामाता नगर हॉस्टेल प्रकल्प – २० कोटी
  • मिल मजदूर घर योजना – ५७.५० कोटी
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुनर्विकास प्रकल्प – २०० कोटी
  • मालवणी झोपडपट्टी सुधार प्रकल्प – ५० कोटी
  • मगाठाणे बोरीवली योजना – ८५ कोटी

मुंबईकर आणि महाराष्ट्रातील नागरिकांना मोठी संधी

म्हाडाच्या या नव्या योजनांमुळे सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांची संधी उपलब्ध होणार आहे. वाढत्या (Mhada Lottery) घरांच्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे. म्हाडाच्या आगामी लॉटरीसाठी इच्छुकांनी वेळेवर अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा.