Millet Milk : आरोग्यासाठी फायदेशीर आहे ग्लुटेनमुक्त मिलेट्स मिल्क; जाणून घ्या प्रकार आणि फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Millet Milk) तुम्ही दिवसभरात तुमच्या कामात कितीही व्यस्त असलात तरीही तुमचे आरोग्य ही तुमची जबाबदारी आहे हे विसरता कामा नये. त्यामुळे प्राधान्याने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. यासाठी तुमच्या आयुष्यात छोटे- मोठे बदलसुद्धा खूप फायदेशीर ठरू शकतात. जसे की सकस आणि पूर्ण आहार घेणे. याशिवाय निरोगी आयुष्यासाठी नियमित शारीरिक हालचाल करणे. तसेच मानसिक शांततेसाठी ध्यानधारणेचा अभ्यास करणे. असे अनेक सोपे उपाय केल्याने तुम्हाला कोणत्याही रोगाचा सामना करावा लागत नाही.

यामध्ये तुमच्या आहारात मिलेट्स दूधचा जर समावेश असेल तर आणखी उत्तम. अनेक लोकांना मिलेट्स दूध म्हणजे काय? याबाबत अद्याप माहिती नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या मिलेट्स दुधाविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

मिलेट्स दूध म्हणजे काय? (Millet Milk)

मिलेट्स म्हणजे तृणधान्य. जे जगभरातील विविध ठिकाणी पिकवली जातात. हा भरड धान्याचा एक असा प्रकार आहे ज्यापासून दुधाची निर्मिती केली जाते. गहू तांदूळ वगळता इतर ज्या धान्यांवरचे नैसर्गिक आवरण भरड करून काढले जाते ज्यांचा वापर आहारात करता येतो त्याला ‘भरड धान्य’ असे म्हणतात. मिलेट्सचा वापर करून ‘मिलेट्स दूध’ तयार केले जाते. जे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे अनेक तज्ञांनी म्हटले आहे.

(Millet Milk) कारण मिलेट्स दुधात फायबर, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच मिलेट्स नैसर्गिकरित्या ग्लुटेनमुक्त असतात. त्यामुळे अनेक पोषणतज्ञ मिलेट्स दुधाचा दैनंदिन आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात.

मिलेट्स दूध कसे बनते?

मिलेट्स दूध तयार करण्यासाठी आधी धान्य भिजवून घ्यावे लागते. तसेच काही पद्धतींमध्ये दळून किंवा पाण्यात एकत्र करून त्यापासून दूध काढले जाते. मलाईदार दुधासारखी सुसंगता मिळवण्यासाठी तयार द्रव गाळून बाकीचे कण काढून टाकले जातात. त्यामुळे मिलेट्स दूध अगदी इतर दुधासारखे शुभ्र आणि गुळगुळीत दिसते.

मिलेट्स दुधाचे प्रकार

1. नाचणी/ रागी मिलेट्स दूध – (Millet Milk) नाचणीचे दूध तयार करण्यासाठी रात्रभर भिजवलेली नाचणी किंवा मोड आलेल्या नाचणीचा वापर केला जातो. यापासून बनवलेले दूध कॅल्शियम, लोह, अँटि- ऑक्सिडंट आणि क जीवनसत्व या पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असते.

2. बाजरी/ पर्ल मिलेट्स दूध – बाजरी ही मुळातच पौष्टिक आणि विविध जीवनसत्वे खनिज आणि अँटिऑक्सिडेंटने भरलेली असते. त्यामुळे हे दुध कॅल्शियम तसेच प्रथिनांनी समृद्ध असते. शिवाय यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

3. प्रोसो मिलेट्स दूध – प्रोसो मिलेट्स हे भारतात चेना म्हणून ओळखले जातात. या मिलेट्समध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे प्रोसो मिलेट्स दुधाचे आहारात सेवन केल्यास जीवनसत्वे, खनिजे, कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात. तसेच पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर लाभ मिळतात. (Millet Milk)

4. फॉक्सटेल मिलेट्स दूध – फॉक्सटेल मिलेट्सला भारतात कांगणी किंवा काकूम म्हणून ओळखले जाते. त्यालाच इटालियन मिलेट्स असे सुद्धा म्हणतात. फॉक्सटेल मिलेट्सपासून तयार झालेल्या दुधात जीवनसत्वे खनिज आणि अँटी- ऑक्सिडेंट असतात.

5. ब्राऊन टॉप मिलेट्स दूध – ब्राऊन टॉप मिलेट्सला भारतात कोरा म्हणून ओळखले जाते. या मिलेट्समध्ये जीवनसत्वे, खनिजे, कॅल्शियम आणि प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात. (Millet Milk) शिवाय या मिलेट्समध्ये अँटी- ऑक्सिडेंटचा मोठा समावेश असतो. म्हणून ब्राऊन टॉप मिलेट्स अँटी- ऑक्सिडेंटचा समृद्ध स्त्रोत म्हणून ओळखले जातात.

मिलेट्स दुधाचे फायदे

1. रोगप्रतिकारक शक्ती वाढते – मिलेट्स दूध हे अत्यंत पौष्टिक आणि अँटी- ऑक्सिडेंटने परिपूर्ण असते. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक जीवनसत्वे आणि खनिजे हे त्यातून मिळत असतात. परिणामी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते. (Millet Milk)

2. पोटाच्या समस्यांपासून संरक्षण देते – मिलेट्स दुधामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपल्या पोटाचे आरोग्य राखण्यासाठी मिलेट्स दुधाचे सेवन फायदेशीर ठरते. याशिवाय आतड्यांना कोणत्याही आजारांपासून संरक्षण देण्यास आणि निरोगी पचन संस्था राखण्यासाठी मिलेट्स दूध प्रभावीपणे काम करते.

3. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते – (Millet Milk) मिलेट्स दूध हे ग्लूटन मुक्त असते. त्यामुळे आहारासाठी मिलेट्स दूध कधीही उत्तम पर्याय मानला जातो. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे किंवा नियंत्रित करायचे आहे त्यांच्यासाठी मिलेट्स दूध हा एक उत्तम पर्याय असल्याचे तज्ञ सांगतात.

लक्षात ठेवा

मिलेट्स दूध हे नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. मात्र ज्या लोकांना मिलेट्स किंवा कोणत्याही धान्याची ऍलर्जी आहे त्यांनी मिलेट्स दुधाचे सेवन करण्याआधी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच मिलेट्स दुधाचे सेवन करण्याआधी एकदा वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. (Millet Milk)