सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये आज (5) मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये मराठी चित्रपट सृष्टीला उभारी देण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टी ही लवकरच कात टाकणार असून त्याला नवी उभारी मिळणार आहे. या बैठकीत चित्रपट निर्मितीसाठी अर्थसहाय्य देण्यापासून ते अनेक महत्त्वाच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला संस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील उपसचिव महेश वावळ, बाळासाहेब सावंत, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक मीनल जोगळेकर, कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे आदी सहकाऱ्यांसह प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे, निर्माते संदीप घुगे बाबासाहेब पाटील, गार्गी फुले, अशोक राणे, हेलन मेहता, जयेश जोशी, अरुंधती रवींद्र मोरे, बाळासाहेब गोरे, चंद्रकांत विसपुते, शिरीष राणे, प्रशांत मानकर, आदी चित्रकरणी उपस्थित होते. चला जाणून घेऊयात या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले आहेत.
याबाबत माहिती देताना मुनगंटीवार यांनी सांगितलं की, मराठी चित्रपट धोरण लवकरच तयार करण्यात येणार असून त्याबाबतची समिती गठित करण्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आपल्या राज्याला चित्रपटाचा समृद्ध वारसा लाभला आहे. आपल्या मराठी चित्रपटांचा हा वारसा जतन करण्यासाठी आगामी काळात भव्य असे मराठी चित्रपट संग्रहालय उभारणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यासाठी समिती स्थापन करण्याच्या सूचनाही त्याने संस्कृतीक विभागाला दिलया आहेत.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, मराठी चित्रपटांचा दर्जा वाढावा सिनेमागृहांमध्ये मराठी चित्रपट प्रेक्षकांची गर्दी व्हावी तसेच निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते यांचे मनोबल उंच व्हावं हेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या धोरण असून या सर्व बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे अशी ग्वाही मंत्री मुनगंटीवार यांनी दिली.
‘या’ महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश
- नागपुरात100 हेक्टर मध्ये भव्य चित्रनगरी उभारणार
- अर्थसहाय्य योजनेतून निर्मात्यांना बळ देण्याच्या सूचना
- दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अर्थसाहाय्यकरीता दर्जा देताना ‘अ’ आणि ‘ब’ दर्जासह ‘क’ दर्जाचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
- आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांना दुप्पट अनुदान मिळणार.
- तसेच पुरस्कार प्राप्त महिला दिग्दर्शकाला प्रोत्साहन पर पाच लाख रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
- याशिवाय या घोषणांचा तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.